spot_img
अहमदनगरपवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

spot_img

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत
​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
जिल्ह्यातील पारनेर व आसपासच्या परिसरात पवनचक्क्यांच्या टॉवरवरील मौल्यवान कॉपर केबलची चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. LCB ने या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४ गुन्हे उघडकीस आणत ५ लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
​याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहाजांपुर (ता. पारनेर) शिवारातील सुजलान कंपनीच्या टॉवरवरून २० जून ते ११ सप्टेंबर २०२५ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कॉपर केबल चोरून नेली होती. याप्रकरणी श्री संतोष भिका लंके (वय ४६, रा. हंगा, ता. पारनेर) यांनी सुपा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.

​जिल्ह्यात कॉपर वायर चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी LCB ला गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पो.नि. श्री. किरणकुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे रमेश गांगडे, फुरकान शेख, अतुल लोटके, गणेश लवडे, रिचर्ड गायकवाड, भिमराज खसें, भाऊसाहेव काळे, अमोल कोतकर, अरुण मोरे तसेच सुपा पोलीस स्टेशनचे मेघराज कोल्हे, योगेश सातपुते यांचे पथक तयार करण्यात आले.

​पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना, सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अतुल विश्वनाथ शिंदे (रा. शहांजापुर) याने केल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून अतुल विश्वनाथ शिंदे (वय ३५, रा. शहांजापुर), संकेत बाळासाहेब म्हस्के (वय २२, रा. पिंपळगाव कौंडा) आणि अनिकेत शशिकांत गवळी (वय ३०, रा. शहांजापुर) यांना सुपा येथून ताब्यात घेतले.

​त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा इतर साथीदारांसह केल्याची कबुली दिली. यामध्ये ऋषीकेश सुनिल पवार (रा. पिंपळगाव कौंडा, फरार), अरुण शिवाजी गवळी (रा. शहांजापुर), पप्पु वावाजी जाधव, प्रवीण सावकार म्हस्के, श्रीकांत संपत साठे (रा. हंगा) स्वप्नील पवार व अक्षय सकट (फरार) यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
​पोलिसांनी आरोपींकडून ५,२५,६००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी सुपा पोलीस स्टेशनच्या हवाली करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB व सुपा पोलिसांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...

मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याचा कट; कोणी दिली सुपारी; बड्या नेत्याचे नाव

बीड / नगर सह्याद्री मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा एक...