spot_img
अहमदनगरमेंढपाळावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद! एलसीबीने 'असा' लावला होता सापळा...

मेंढपाळावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद! एलसीबीने ‘असा’ लावला होता सापळा…

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
विळद येथील शिवारात मेंढपाळाच्या पालावर दरोडा टाकून महिलांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने चोरणाऱ्या टोळीचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच आरोपींना अटक केली आहे. ५ आरोपीकडून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन आरोपी फरार आहेत. तसेच या टोळीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्येही अशाच स्वरूपाचा दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे.

मेंढपाळाचे पालावर दरोडा टाकल्याची घटना आठ दिवसापूर्वी घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोपट बन्सी होडगर (वय 35, रा. पिंप्री घुमट) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने कारवाई करण्याची मोहीम राबवली.

पथकाला गुप्त बातमीदाराकडून सदरचा गुन्हा किसन उर्फ विजय गौतम काळे (रा.पानसवाडी, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर ) याने त्याचे साथीदारासोबत केला असून ते चोरीचे सोने विक्री करण्यासाठी पांढरीपुल येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपीमध्ये भैय्या कडु काळे ( रा.शिरोडी, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर), ताराचंद विरूपन भोसले ( रा.गाजगाव, ता.गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), किसन उर्फ विजय गौतम काळे ( रा.पानसवाडी, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर), नागेश विरूपन भोसले ( रा.गाजगाव, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर), सोनुल लक्षरी भोसले ( रा.बिडकीन, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर ) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून १२ ग्रॅम सोन्याचे दागिने, चार मोबाईल आणि दोन मोटारसायकली असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तपासादरम्यान आरोपींनी गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) येथील मांजरी शिवारातही असाच दरोडा टाकल्याची कबुली दिली. गंगापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. ताब्यातील आरोपींना एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून बदाम काळे (रा. शिरोडी), रघुवीर भोसले (रा. गाजगाव), महेश काळे (रा. खोसपुरी), बदाम काळे (रा. शिरोडी) अद्याप फरार आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बिरप्पा करमल, गणेश धोत्रे, अरूण गांगुर्डे, भगवान धुळे, गणेश लोंढे, शाहीद शेख, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, रविंद्र घुंगासे, आकाश काळे, भगवान थोरात, भाऊसाहेब काळे, सुनील मालणकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर व अरूण मोरे यांनी बजावली आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! तीन आरोपी जाळ्यात..

अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- पाथर्डी तालुक्यात आणि नगर परिसरात भीती निर्माण करणाऱ्या घरफोडी व...

वीजपुरवठा खंडित; नागरिक वैतागले; आमदार जगताप यांना दिले निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कल्याण रोड परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून,...

सहकार हा समाजाच्या आर्थिक उन्नतीचा पाया: आमदार दाते

पारनेर | नगर सह्याद्री सहकार ही सामूहिक प्रयत्नांतून सर्वांगीण प्रगती साधणारी संकल्पना आहे. ग्रामीण भागातील...

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई!, ‘या’ प्रकरणातील दोन मुख्य आरोपी जेरबंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री तपोवन रोडवरील गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे...