spot_img
ब्रेकिंगनगर जिल्ह्यातील होलसेल गांजा पुरवठा करणारी टोळी गजाआड; ८८ लाख रुपयांचा मुद्देमाल...

नगर जिल्ह्यातील होलसेल गांजा पुरवठा करणारी टोळी गजाआड; ८८ लाख रुपयांचा मुद्देमाल ट्र्क जप्त

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
ओडिशा राज्यातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करून अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये होलसेल गांजा पुरवणार्‍या टोळीचा कोतवाली पोलिसांनी पर्दाफाश करत दहा जणांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून तब्बल १९ लाख ९० हजार रुपयांचा गांजा, तीन वाहने, ११ मोबाईल असा ८८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संतोष प्रकाश दाणावे (रा. वाळवणे, ता. पारनेर), गणेश बापू भोसले (रा. जामखेड ), प्रशांत सुरेश मिरपगार (रा. कामत शिगये, ता. पाथर्डी) प्रदिप बापू डहाणे (रा. पिंपळगाव लांडगा, ता. नगर), भगवान संजय डहाणे (रा. पिंपळगाव लांडगा ता. नगर), संदिप केशव बाग (रा. लेद्रीमाल, जिल्हा बेथ राज्य उडोसा), दिलीप माखनो भेसरी (रा. घुडाधार, जिल्ला बेनिका, राज्य उडीसा), अक्षय बापू डहाणे (रा. पिंपळगाव लांडगा, ता. नगर), प्रमोद सुहास क्षेत्रे (रा. आलमगीर, भिंगार, ता. नगर), ईश्वर संतोष गायकवाड (रा. पिंपळगाव लांडगा, ता. नगर) अशी गांजा पुरवणार्‍या टोळीतील आरोपींचे नावे आहे.

दि. १९ जून रोजी कोतवाली पोलिसांना उडीसा राज्यातून १४-टायर मालट्रक (एम.एच. १६ सी. झी.०४५२) वाहनामधून गांजा आणला जात आहे आणि केडगाव बायपास परिसरात तो वितरित होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना माहिती दिली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्यानंतर पथक तयार करून केडगाव बायपास रोडवरील टोलनाक्या जवळ सापळा रचण्यात आला.

रात्री साडे दहाच्या दरम्यान एक संशयास्पद मालट्रक टोलनाका पार करताना दिसल्यावर त्याला थांबवण्यात आले. चालक संतोष प्रकाश दानवे (रा. वाळवणे, पारनेर) याच्याकडे विचारपूस केली असता, ट्रकच्या केबिनवर लपवून ठेवलेल्या ४ गोण्यांमध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचासमक्ष झडती घेतली असता १९ लाख ९० हजार रुपये किंमतीचा गांजा मिळून आला.

अधिक विचारपूस केली असता ट्रकचालकाने उडीसा राज्यातून गांजा आणला असुन गांजा माल घेण्यासाठी काही लोक टोलनाक्यापासून जवळच असलेल्या मोकळ्या ठिकाणी येणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर पथकाने गांजा घेण्यासाठी येणाऱ्या खरेदीदारांशी फोनवर संपर्क ठेवण्यास सांगितले. काही वेळात खरेदीदार लाल रंगाच्या स्विफ्ट कार (एम.एस.१६.सी.की. २७८६) नंबरच्या व काळ्या रंगाच्या होंडा सिटी ( एम.एच.१२. सी.डी.११२७.27) नंबरच्या चर चाकी वाहने आली. काही कळण्याच्या आतच पोलीसांनी मालट्रक मधील ३ जणांनासह दोन चारचाकी वाहनातील सात आरोपीना ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलिस उपनिरीक्षक शितल मुगडे, स.फो. बोडखे, म.पो.हे.कॉ. रोहिणी दरंदले, पो.हे. करें. राजेंद्र ओटी, सचिन मिरपगार, गणेश चक्षाण, रहुल शिंदे, संदिप पितळे, पोकॉ. दिपक रोहोकले, तानाजी पवार, दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो.कॉ. राहुल गुंडु, कोतवाली पोलीस स्टेशनचे पो.कॉ. सुरज कदम, सचिन लोळगे, शिरीष तरटे, अतुल कोतकर, राम हंडाळ, संकेत धिवर, सोमनाथ राऊत, बाळासाहेब ढाकणे, अर्जुन फुंदे, म.पो.कॉ. प्रतिभा नागरे यांच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रस्त्यावर अनधिकृत बांधकाम; 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, अहिल्यानगर क्राईम वाचा एका क्लिकवर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे भिंत...

रानात हत्येचा थरार! नवऱ्याचे बायकोवर धारदार शस्त्राने डझनभर वार, कारण काय?

Maharashtra Crime: परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सोनपूर तांडा येथे पतीने पत्नीवर शेतामध्ये धारदार शस्त्राने...

…आता माझी जबाबदारी; पारनेरकरांसमोर डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट शब्दात मांडले मत

निघोज । नगर सहयाद्री:- शेतकरी कर्जमाफी आणि कांद्याच्या भाववाढीसाठी 'आपली माती आपली माणसं' या...

धक्कादायक! स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा गोरखधंदा; वेश्याव्यवसाय चालवणारे पती-पत्नी फरार

Crime News: मॉलमधील स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने केला...