spot_img
अहमदनगररात्रीस खेळ चाले...; 'त्या' तस्करांमुळे कोट्यवधींचे नुकसान, नगर-दौंड रोडवरील प्रकार..

रात्रीस खेळ चाले…; ‘त्या’ तस्करांमुळे कोट्यवधींचे नुकसान, नगर-दौंड रोडवरील प्रकार..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
नगर-दौंड रोडवरील अरणगाव, खडकी, खंडाळा हद्दीमध्ये सुमारे 26 पेक्षा अधिक खडी क्रेशर असून त्यातील बहुतांश खडीक्रेशर काही परवानग्या न घेताच सुरु करण्यात आले आहेत. तसेच गौण खनिज तस्करांचा रात्रीस खेळ जोरात सुरु असल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी येथील पिकांवर धुळीचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून खडीक्रशरमुळे शेतीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. याबाबत अरणगाव ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला निवेदन दिले आहे.

अहिल्यानगर तालुक्यात अरणगाव, खंडाळा, खडकी परिसरात मोठ्या प्रमाणात खडी क्रेशर आहेत. त्यातील काही खडीक्रशर परवानग्या न घेताच सुरु केले आहेत. प्रदूषण विभागाची परवानगी नसतांनाही खडीक्रेशर जोमात सुरु आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले असून याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. धुळीने पिकांची वाढ खुंटत असल्याने शेती नापिक बनत चालली आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

अनधिकृत खडीक्रेशर चालकांवर कारवाई करा
अरणगाव, खंडाळा परिसरात खडीक्रेशरमुळे धुळीचे साम्राज तयार होत असून त्याचा पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. फळबागा उद्धवस्थ झाल्या आहेत. याबाबत अनेक वेळा परिसरातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाला अनधिकृत खडी क्रेशर चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली. उपोषण केले. परंतु महसूल प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विना परवानगी खडीक्रेशर चालकांवर कारवाई करण्याची मागणी अरणगाव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

विना परवानगी क्रेशर चालकांवर कारवाई होणार का?
खडकी, खंडाळा, अरणगाव परिसरात गौण खनिज तस्करांचा धुमाकूळ घातला आहे. रात्रीचा खेळ जोरात सुरु आहे. याकडे महसूल प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वारंवार निवेदने, आंदोलने दिली तरी गौण खनिज तस्करांवर कारवाई होत नाही. परिसरातील खडीक्रेशरला सर्व परवानग्या आहेत का? सर्कल, तलाठी नेमकं काय करतात? अनधिकृत खडी क्रेशर चालकांवर कारवाई का केली जात नाही असे अनेक सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खडीमाफिया दत्तात्रय शेळके म्हणतो, कलेक्टर अन्‌‍ पोलीस माझ्या खिशात!

अकोले तहसीलदारांनी वहिवाट रस्ता मंजूर केला, बेलापूरच्या खडी क्रशरवाल्याने उखडून टाकला! 10 लाख खर्चून तयार...

‘सिस्पे’, साकळाई योजनेबद्दल विखे पाटलांचे मोठे विधान, जनतेच्या पैशाची जबाबदारी ‘त्या’ लोकप्रतिनिधीची

पद्मश्रींच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना सन्मान; शेतकरी दिनाच्या घोषणेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे डॉ. सुजय विखे...

आझाद ठुबे यांच्या राजे शिवाजी पतसंस्थेत 67 कोटींचा घोटाळा

अपहाराशी संबंधित 40 घोटाळेबहाद्दरांसह सहा कर्मचारी दोषी पारनेर | नगर सह्याद्री माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद...

गणेश मंडळांना मिळणार एका क्लिकवर परवानगी; आयुक्त डांगे यांनी दिली माहिती, पहा लिंक..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री गणेशोत्सवात व इतर सण-उत्सव काळात मंडप उभारणी, स्वागत कमानी, रनिंग मंडपसाठी...