spot_img
अहमदनगरबळीराजासाठी जुगाड! पाठीवर भलं मोठं ओझं घेऊन फवारणी करण्यापेक्षा वापरा 'ती' ट्रिक्स..

बळीराजासाठी जुगाड! पाठीवर भलं मोठं ओझं घेऊन फवारणी करण्यापेक्षा वापरा ‘ती’ ट्रिक्स..

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
पाठीवर भलं मोठं ओझं घेऊन फवारणी करण्यापेक्षा ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करताना शेतकरी दिसत आहेत . ड्रोन च्या माध्यमातून आठ मिनिटात एक एकरावर फवारणी होते .त्यासोबतच कीटकनाशक औषधांची बचतही होते. अशा ड्रोन कॅमेरा अंतर्गत तुर ,मका तसेच ऊस पिकावर औषध फवारणी करण्यासाठी ड्रोन भाडेतत्त्वावर मिळत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव येथे ड्रोन च्या साह्याने तूर पिकावर फवारणी करण्यात आली.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती वरती मोठ्या संख्येने नागरिक रोजगारासाठी अवलंबून आहेत. मात्र वेळेवर मजूर मिळत नसल्याने ड्रोन च्या साह्याने फवारणी करण्यात आली. यामध्ये पारंपरिक शेतीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागतं. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती करण्याला प्रधान्य देत आहे. शेतामध्ये पिकावर फवारणी करण्यासाठी पाठीवर दहा-बारा किलोचा फवारणी यंत्र घेऊन संपूर्ण शेत पालथ घालून पिकावर ती फवारणी करावी लागायची यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ लागायचा आणि शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. यावर पर्याय म्हणून …भाडेतत्त्वावर शेतकऱ्यांनी ड्रोनच्या साह्याने फवारणी केली.

एकरभर शेतासाठी दहा लिटर पाणी लागते आणि यात ४०टक्के कीटकनाशक औषधांची बचत होते. ड्रोन फवारणी यंत्राच्या माध्यमातून कीटकनाशक, औषध फवारणी सोपी झाली आहे .फवारणी केल्यामुळे शेतकऱ्याला काम करणं सोपं झाले आहे. पाठीवरचे पंप घेऊन फवारणी करताना शेतकऱ्यांना विषबाधा होत असे मात्र ड्रोन द्वारे हा धोका टाळता आला आहे. जुनी यंत्राच्या तुलनेत यामध्ये वेळ कमी लागतो. श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव येथील चंद्रक्षण बोराटे व बाळू चव्हाण यांच्या शेतामध्ये ड्रोन च्या साह्याने तुर पिकावरती फवारणी करण्यात आली .

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अक्षय कर्डिलेंना जिल्हा बँकेत तोच न्याय मिळणार का?

अहिल्यानगर / नगर सह्याद्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणासह जिल्हा बँकेत...

..आता दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे, अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्याविरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून...

संतापजनक! रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत भयंकर घडलं, रात्री परतताना चालकाने केलं असं काही..

Maharashtra Crime News : महिलांचा लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना अजूनही थांबत नाहीत. अशात सहकाऱ्याकडूनच...

हवामान खात्याची महत्वाची अपडेट, काय दिला इशारा?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून...