spot_img
अहमदनगरAhmednagar: गल्लोगल्ली गावठी कट्टा! वापर रोखण्यासाठी 'ती' मोहीम, 'महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी...

Ahmednagar: गल्लोगल्ली गावठी कट्टा! वापर रोखण्यासाठी ‘ती’ मोहीम, ‘महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी घेतला आढावा’

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
गावठी कट्ट्यांचा वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली जाईल, गावठी कट्टे बहुतांश मध्य प्रदेशातून येतात. महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवरील जिल्ह्यांच्या बैठकीत याबाबत आढावा घेतला जाईल, असे नाशिक परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सांगितले.

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी नाशिक परिक्षेत्राची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच नगरला भेट दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक ज्ञानेश्वर ढिकले उपस्थित होते. विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेऊन तपासात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची सूचना केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, यापूर्वी आपण नगर व संगमनेरमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केले असल्याने आपल्याला जिल्हा परिचित आहे. त्याचा उपयोग काम करताना होईल.

जिल्ह्याची लोकसंख्या, गुन्ह्यांचे प्रमाण, भौगोलिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्रांची मोठी संख्या लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस संख्याबळ ५०० ने वाढवावे यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. याबरोबर ८ नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव पूर्वीच पाठवला आहे. कोपरगाव, पाथर्डी, श्रीरामपूर येथील पोलीस वासाहतींचे प्रस्ताव मार्गी लागले आहेत. जिल्हा पोलीस दलातील ’सीसीटीएनएस’ प्रणाली अद्ययावत केली जात आहे. त्याचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. सध्याची प्रणाली कालबाह्य झाली आहे. त्याच्यामुळे त्याचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...