spot_img
अहमदनगर'सातपुते' यांच्यावर हल्ला करणारा 'गजाआड'; डिवायएसपी भारती यांच्या पथकाची कारवाई

‘सातपुते’ यांच्यावर हल्ला करणारा ‘गजाआड’; डिवायएसपी भारती यांच्या पथकाची कारवाई

spot_img

Ahmednagar Crime: भाजपा पदाधिकार्‍यावर हल्ला करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिवायएसपी भारती यांच्या पथकाने एकाला गजाआड केले आहे. राजेंद्र मोहन पठारे (वय 43 रा. भूषणनगर, केडगाव) असे त्याचे नाव आहे. भाजपा पदाधिकारी नीलेश भाऊसाहेब सातपुते (वय 38 रा. सातपुते चौक, केडगाव) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अधिक माहिती अशी: अवैध बांधकामाबाबत प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून 17 जणांच्या टोळक्याने नीलेश सातपुते यांच्यावर हल्ला करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून 17 जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व संशयित पसार झाले आहेत. त्यातील राजेंद्र पठारे हा त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती अहिल्यानगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांना मंगळवारी (8 ऑक्टोबर) मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार सचिन जाधव, गणेश चव्हाण यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने राजेंद्र पठारे याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात विजय मोहन पठारे, प्रशांत बारस्कर, अजय राजू पठारे, विजय राजू पठारे, आकाश औटी, मयुर चावरे, सनी भुजबळ, राहुल झेंडे, गितेश ऊर्फ भैया पवार, राकेश ठोकळ, परशुराम बुचाळे, सोनू परदेशी, आकाश सांगळे, विशाल दळवी, अंशु चव्हाण, अजय बुचाळे (पूर्ण नाव, पत्ता नाही) हे सर्व संशयित आरोपी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...

२६ गोवंशीय जनावरांची सुटका; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा, ३ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची...