अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून आता वेध लागलेत ते निकालाचे. असे असतांनाच महायुती आणि महाविकास आघाडीत अनेकांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही आघाडीत टोकाचा संघर्ष सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
त्यातच अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यामध्ये निवडणूक निकालापूव भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स झळकले आहेत. त्यामुळे संगमनेरमधील थोरात यांचा भावी मुख्यमंत्री असा लावलेला फ्लेक्स राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हल्यात सरासरी 72.47 टक्के मतदान झाले असूून गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा मतांचा टक्का वाढला आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी
अकोले- 71.98, संगमनेर- 75.19, शिड – 75.81, कोपरगाव – 71.31, श्रीरामपूर- 70.24, नेवासा-79.84, शेवगाव 69.36, राहुरी 74.52, पारनेर – 70.19, नगर शहर – 63.85, श्रीगोंदा – 73.85, कर्जत-जामखेड 74.97, एकूण- 72.47 टक्के.