spot_img
ब्रेकिंगग्रामस्थांचा संयम सुटला; थेट तलाठी कार्यालयासमोर अंत्यसंस्कार! कारण काय?

ग्रामस्थांचा संयम सुटला; थेट तलाठी कार्यालयासमोर अंत्यसंस्कार! कारण काय?

spot_img

Maharashtra News:बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील तरवाडी येथे तब्बल २० वर्षांपूर्वी बांधलेल्या स्मशानभूमीकडे अद्याप पक्का रस्ता नसल्याने, अखेर ग्रामस्थांचा संयम सुटला. गावातील एका शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी थेट तलाठी कार्यालयासमोर मृतदेहावर अंत्यसंस्कार करत प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला.

तरवाडी गावात शासनाच्या निधीतून स्मशानभूमी उभारण्यात आली असली, तरी तेथे जाण्यासाठी कोणताही रस्ता नसल्यामुळे मृतदेह नेणे अत्यंत कठीण बनले आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखल, घसरट मार्ग आणि वाहतुकीचा अभाव यामुळे अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांना पर्यायी ठिकाणं शोधावी लागतात.

गावातील एक शेतकरी निधन पावल्यावर त्यांच्या कुटुंबाने स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. पण रस्ता नसल्याने मृतदेह नेणे अशक्य झाल्यामुळे तलाठी कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करून निषेध व्यक्त करण्यात आला.

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही, हे ठळकपणे समोर आले आहे. रस्ता नसलेली स्मशानभूमी केवळ नावापुरती असून, ही समस्या गेली दोन दशके सुरूच आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दिल्लीत भीषण स्फोट; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लेखोरांना तीव्र शब्दांत इशारा; एकालाही सोडणार नाही..

नवी दिल्ली | वृत्तसंस्था देशाची राजधानी दिल्ली बॉम्बस्फोटामुळे हादरली. ऐतिहासिक लाल किल्ल्‌‍याजवळील लाल किल्ला...

टाकळी ढोकेश्वरचा वाळू माफिया गजाआड ;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

१५ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू माफियाविरुद्ध...

‘मुलाचे बरेवाईट झाल्यास सोडणार नाही’; विद्यार्थिनीला धमकावणे पडले महागात, वाचा प्रकरण

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- एका १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर प्रेमसंबंधासाठी बळजबरी, सतत पाठलाग आणि...

आ. सत्यजीत तांबे यांची पत्रकार परिषद; संगमनेरकरांसाठी महत्वाची अपडेट..

संगमनेर । नगर सहयाद्री:- संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या थेट सहभागातून जाहीरनामा...