अहमदनगर | नगर सहयाद्री:-शासनाच्या विविध योजना शेवटच्या दारापर्यंत घेऊन जाण्याचे काम आम्ही करत आहोत, आमचे काम हे वास्तविक असून निवडणूक ही झालेल्या विकास कामावरच लढवली जाईल, नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्ही फुल टाइम काम करत आहोत. काहीजण काल्पनिक चित्र निर्माण करू पाहत आहे, असा टोला आमदार संग्राम जगताप यांनी लगावला आहे.
भिंगार पंचशील नगर येथे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत आमदार संग्राम जगताप बोलत होते. यावेळी प्रा.माणिकराव विधाते, संभाजी भिंगारदिवे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, सुरेश बनसोडे, कलीम शेख, जया गायकवाड, सिद्धार्थ आढाव, श्याम वागस्कर, संजय सपकाळ, मुसा सय्यद, सुरेश मेहता, संपत बेरड, सुदाम गांजले, सुहास धीवर, अनिल तेजी, भाऊ भिंगारदिवे, ज्ञानेश्वर फासे, एकनाथ भिंगारदिवे, अमित खामकर, अजिंय भिंगारदिवे, मतीन शेख, दीपक निपाणी, अक्षय नागपुरे, दीपक राहींज, विशाल बेलपवार, प्रदीप वावरे, अक्षय भिंगारदिवे, संजय खताडे, सागर चवंडके, प्रवीण चव्हाण, मंगेश खताळ, शिवम भंडारे, सुभाष साळवे, संतोष बोबडे, अंकुश मोहिते, विशाल राहींज, दिनेश लंगोटे, एकनाथ भिंगारदिवे, विजय बोंदर्डे, सुदर्शन भिंगारदिवे, संजय भिंगारदिवे आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे बोलतांना आ.जगताप म्हणाले, राज्य सरकारच्या माध्यमातून बहुतांश रस्त्यांची कामे मंजूर केली असून ती लवकरच पूर्ण होतील. विधानसभा मतदार संघांमधील विविध भागात सामाजिक भवनाची निर्मिती केली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार या ठिकाणी मांडले जाते, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणी काम सुरू आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे,
तसेच माळीवाडा येथे देखील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा संयुक्त पुतळा उभारणी कामाचे भूमिपूजन लवकरच होणार आहे, सामाजिक विचारांची झालर महापुरुषांच्या विचारातून होत असते, असेही जगताप म्हणाले. संभाजी भिंगारदिवे म्हणाले की, भिंगार शहराच्या विकासाला आ. संग्राम जगताप यांनी निधीच्या माध्यमातून गती दिली आहे, आत्तापर्यंत एवढी विकास कामे कधी झाली नव्हती, सर्वांना बरोबर घेऊन काम करत असल्यामुळे जनतेचे प्रश्न सुटले जात आहे असे ते म्हणाले.
यावेळी प्रा.माणिकराव विधाते यांनी राज्य शासनाची लाडकी बहीण योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी सर्वांनी काम करावे असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ आढाव यांनी केले तर आभार सुहास धीवर यांनी मानले.
लवकरच भिंगारचा महापालिकेत समावेश होईल
भिंगार शहरांमध्ये विकासाची कामे करीत असताना प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागते. भिंगार शहराचा महापालिका हद्दीमध्ये समावेश करण्यासाठीची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. नगर महानगरपालिका निवडणुकीपर्यंत भिंगार शहराचा समावेश होईल.
-आमदार संग्राम जगताप