मुंबई । नगर सहयाद्री:-
विधानसभेचे बिगुल वाजणार असून सर्वच पक्षानीनिवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरुन कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी सर्वात महत्वाचे विधान केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सध्या महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा काढली आहे. सध्या अजित पवार हे विदर्भ दौऱ्यावर असून आज ते काटोलमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले ,जिथे जिथे तिथे उमेदवार मागच्या वेळी निवडून आले होते तिथे-तिथे आम्ही जातोय. आज काटोल आणि नागपूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा निधी वितरण करणार आहे. उद्या वरुड मोर्शी पुसद याठिकाणी आम्ही जाणार आहोत.आतापर्यंत आमचा एक राऊंड झालेला आहे.
आम्ही सर्वच एकत्रपणे निवडणूक लढणार आहोत. साधारणता 288 मतदार संघाचा विचार करून एकमत करू. ज्यावेळी जागा निश्चित होतील. त्यावेळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू, इलेक्टिव्ह मेरिट निकष आहे असं म्हणत अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.