पारनेर । नगर सहयाद्री:-
आमदारकीच्या माध्यमातून सुपा गटातील गावांच्या विकासात्मक कामाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. काशिनाथ दाते यांनी दिली. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातून काशिनाथ दाते विजय व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांनी नारायणगव्हाण येथील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या प्रसिद्ध चुंबळेश्वर महादेव मंदिरात पेढे तुला करण्यात येईल असे महादेवाला साकडे घातले होते.
यावेळी आ. काशिनाथ दाते यांची पेढे तुला करण्यात आली.कार्यक्रमप्रसंगी भाजप नेते विश्वनाथ कोरडे, जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड, भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विक्रमसिहं कळमकर, नारायणगव्हाण माजी सरपंच सुरेश बोरुडे, दत्ता पवार, सुनील थोरात, पंकज कारखिले वसंत चेडे,अमोल मैंड, शंकरराव कांडेकर, सुषमा रावडे,सहादू शेळके बंडोपंत नाईक, माणिक शेळके, अविनाश ठुबे, अरुण चिपाडे, दिलीपराव शेळके, काशिनाथ नवले,सुदाम नवले, गणेश विक्रम शेळके ,शिवाजी भोसले, हसन शेख ,गणेश डोमे, श्रीधर वाळुंज, तारा दरेकर, राहुल कांडेकर,चंदू कांडेकर, दादासाहेब शेळके, सविता भोसले, मंदा चव्हाण,मंगल चिपाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश शेळके यांनी केले तर आभार मेजर काशिनाथ नवले यांनी मानले.
विजयासाठी महादेवाला घातले साकडे!
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातून काशिनाथ दाते विजय व्हावेत यासाठी बाळासाहेब चव्हाण, काशिनाथ नवले, अण्णा चव्हाण, संजय शेळके बाळासाहेब नवले,अण्णासाहेब नवले, मेजर सतीश चिपाडे, दगडू हारदे या तरुणांनी पेढे तुला करण्याचे महादेवाला साकडे घातले होते व मतमोजणीच्या दिवशी सदर तरुणांनी मंदिरात ठाण बैठक मांडली होती.
चुंबळेश्वर महादेव मंदिराचा तीर्थक्षेत्र क वर्गात समावेश होणार!
आमदारकीच्या माध्यमातून सुपा गटातील गावांच्या विकासात्मक कामाचा प्रश्न सोडवण्यासाठी माझा प्रयत्न राहील. चुंबळेश्वर महादेव मंदिराचा तीर्थक्षेत्र क वर्गात समावेश करण्यासाठी जिल्हा नियोजन बैठकीत प्रयत्न करणार असून असल्याचे आ. काशिनाथ दाते यांनी संगितले.