spot_img
ब्रेकिंगजागावाटपाआधीच आघाडीत बिघाडी; काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीचा अर्ज...

जागावाटपाआधीच आघाडीत बिघाडी; काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीचा अर्ज…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप जाहीर झालेले नाही. कोणती जागा कोणत्या पक्षाला जाणार, याबाबतही अद्याप स्पष्टता नाही. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर यांना पाथरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी काँग्रेसचा विद्यमान आमदार असल्याने दुर्राणींनी अपक्ष अर्ज भरल्याची माहिती आहे.

पाथरी विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहील आणि सुरेश वरपूडकर यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे. काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याचे समजून प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे सर्वांनाच असे वाटत होते की ही जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमध्ये राहील आणि महाविकास आघाडीत बिघाडी होणार नाही. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे स्पष्ट केले आहे.

मुस्लिम उमेदवार देण्याची मागणी
महाविकास आघाडीमध्ये पाथरी विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावी अशी अपेक्षा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती. शरद पवार यांनी काँग्रेसकडे आपण तसा प्रस्ताव पाठवू, असेही म्हटले होते. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला भरभरून मतदान दिले त्याच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीमध्ये जेथे मुस्लिम उमेदवार विजयी होऊ शकतो अशा जागांवर मुस्लिम उमेदवारांना प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी बऱ्याच मुस्लिम संघटनांनी महाविकास आघाडीकडे केली आहे. त्यामुळेच माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघ माझ्यासाठी सोडावा अशी मागणी महाविकास आघाडीकडे केली होती. यापूर्वी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा लढवून जिंकली होती. त्यामुळे ते पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी प्रचंड आग्रही होते.

महाविकास आघाडीमध्ये अद्यापही जागावाटप जाहीर झालेले नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरून बिघाडी केल्याचे स्पष्ट झाले आहे. येणाऱ्या काळात बाबाजानी महाविकास आघाडीच्या दबावाला बळी पडून उमेदवारी अर्ज मागे घेतात का राष्ट्रवादी काँग्रेस सोडून अपक्ष पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतात हे मात्र पहावे लागणार आहे. पण सध्या तरी त्यांनी महाविकास आघाडीच्या दुधामध्ये मिठाचा खडा टाकल्याचे बोलले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार बाळासाहेब थोरात यांचा धक्कादायक पराभव; अमोल खताळ यांनी मारली बाजी..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून एक मोठा धक्कादायक निकाल समोर आला आहे....

‘हॅटट्रिक’ आमदार! संग्राम जगताप यांचा ‘इतक्या’ मतांनी विजय

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र कुणाचा? महायुती की महाविकास आघाडी? सत्तेत कोण आणि विरोधी...

अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडी पिछाडीवर; महायुतीचे ‘हे’ उमेदवार आघाडीवर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र कुणाचा? महायुती की महाविकास आघाडी? सत्तेत कोण आणि विरोधी बाकावर...

विजयाच्या उंबरठ्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; सुजयने माझ्यासाठी..

राहता । नगर सहयाद्री:- माझा विजय मतदारसंघातील जनतेला समर्पित आहेत. सुजयने माझ्यासाठी खूप मेहनत घेतली....