spot_img
अहमदनगरमैत्री भोवली! मेसवाल्या महिलेसोबत धक्कादायक घडलं; घरी बोलवल अन..

मैत्री भोवली! मेसवाल्या महिलेसोबत धक्कादायक घडलं; घरी बोलवल अन..

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
३२ वर्षीय महिलेची एका तरुणासोबत तोंड ओळख झाली. त्याचे रूपांतर मैत्रीत होऊन वारंवार अत्याचार केला. शिवाय ५ लाख ७४८ रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना १६ मे, २०२२ ते १२ जानेवारी, २०२५ पर्यंत घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी ओमकार नामदेव सोनवणे (रा. रहाणेमळा, ता. संगमनेर) या तरुणावर बलात्कारासह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेचा हॉटेल व मेसचा छोटासा व्यवसाय आहे.

तिच्या घरासमोर आरोपीचे चुलते राहत असल्याने आरोपी ओमकार सोनवणे हा नेहमी तेथे येत होता. त्यामुळे त्याची महिलेशी तोंडओळख झाली. त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. १६ मे, २०२२ रोजी सोनवणे याने पीडित महिलेला घरी बोलवले. घरी कोणीच नसल्याने तिचा विरोध झुगारून त्याने अत्याचार केला. यावरून सोनवणे हा तिला वारंवार ब्लॅकमेल करू लागला. पीडित महिलेच्या मुलीच्या नावाने तर कधी प्रेमसंबंधाबाबत तुझ्या नवऱ्याला सांगेल, अशा धमक्या देऊन नांदूर शिंगोटे येथील लॉजवर आणि आरोपी सोनवणे याच्या राहत्या घरी वारंवार अत्याचार केला.

याचदरम्यान, ऑक्टोबर २०२२ मध्ये मला कार घ्यायची असल्याने मला पैसे दे नाही दिले तर तुझ्या नवऱ्याला आपले प्रेमसंबंध आहे असे सांगेन. तेव्हा पीडितेने कार घेण्यासाठी ४ लाख ८९८ रुपये ऑनलाईन पाठविले. त्यानंतर पुन्हा डिसेंबर २०२३ मध्ये मला गाडीचा विमा भरायचा असे सांगून पैशांची मागणी केली. त्यावर पीडितेने ८ ग्रॅमचे मंगळसूत्र बँकेत गहाण ठेऊन पैसे दिले. त्याने पुन्हा गाडीचा हप्ता भरण्यासाठी पीडित महिलेकडून मार्च २०२४ मध्ये तीन तोळ्यांची पोत बँकेत गहाण ठेऊन ५९ हजार ८५० रुपये घेतले.

याशिवाय तिच्या घरी जाऊनही अत्याचार करत राहिला.दरम्यान, १२ जानेवारी, २०२५ रोजी दुपारी पीडितेच्या घरी कोणी नसताना अत्याचार करत माझ्या भावाचे लग्न आहे म्हणून ४० हजार रुपये ऑनलाईन घेतले. बारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून पीडितेने थेट पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली. यावरून शहर पोलिसांनी ओमकार नामदेव सोनवणे याच्यावर बलात्कारासह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पटेल करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...