spot_img
अहमदनगरडिझेल टाकुन मित्रानेच मित्राला जाळले; पारनेर तालुक्यातील 'त्या' मृतदेहाचा उलगडला

डिझेल टाकुन मित्रानेच मित्राला जाळले; पारनेर तालुक्यातील ‘त्या’ मृतदेहाचा उलगडला

spot_img

सुपा । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर – पुणे महामार्गावर पारनेर तालुयातील नारायणगव्हाण गावच्या हद्दीत दि.१८ जून २०२५ रोजी कुकडी कँनलच्या कडेला एका अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. या खुनाचा उलगडा करण्यात सुपा पोलिसांना यश आले असून आरोपीच्या मुसया आवळल्या आहेत. हा मृतदेह युनूस सत्तार शेख (वय-३६ वर्षे श्रीराम चौक, काळे पठार, सर्वे न ५० सासणे नगर हडपसर, पुणे मुळ रा. मुकुंदनगर, जि. सभांजीनगर) यांचा असून हा खून त्याचाच मित्र प्रदिप प्रभाकर शरणागत (वय-२४ वर्षे) याने केला असल्याचे निष्पन्न झाले.

अधिक माहिती अशी : बुधवारी (दि.१८ जून) रोजी सकाळी नारायणगव्हाण गावच्या शिवारातील कुकडी कॅनॉलचे कडेला एका व्यक्तीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला होता. याबाबत सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन सुपा पोलीसांनी चार पथके तयार करुन सोलापूर ग्रामीण, सातारा, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड येथे विविध पोलीस स्टेशनला जावून सदर बाबत मिसींग दाखल आहे का याबाबत पाहणी केली होती.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दाखल मिसिंग मधील युनूस सत्तार शेख (वय-३६ वर्षे श्रीराम चौक, काळे पठार, सर्वे न ५० सासणे नगर हडपसर, पुणे मुळ रा. मुकुंदनगर, जि. सभांजीनगर) याची मिंसिग दाखल झाल्याने सदर मिसिंगचे व सुपा पोस्टे चे गुन्ह्यातील अनोळखी पुरुष जातीचे मयताचे वर्णन मिळतेजुळते आल्याने फुरसुंगी पोलीस स्टेशन व सुपा पोलीस स्टेशन यांचे समांतर तपासात सदर मिसिंगमध्ये त्याचे घरातील नातेवाईकाकडे चौकशी केली. मयताचा मित्र इसम प्रदिप प्रभाकर शरणागत (वय-२४ वर्षे) याच्याकडे तपास केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले.

सखोल चौकशी केली असता त्यानेच खून केल्याचे कबूल केले. या दोघांचा भेकराईनगर येथे गाळा होता. व्यवसायावरून युनूस सत्तार शेख याचे व सदर मित्राचे वाद झाले, यातून त्याने युनूस यांना डोयात दगड घालून ठार केले. त्याचा मृतदेह त्याच्याच ह्युंदाई आय २० कंपनीची गाडी मध्ये घालुन छत्रपती संभाजीनगर येथे घेवुन जात असताना नारायणगव्हाण शिवारात कॅनॉलच्या बाजूला सुनसान ठिकाण वाटले म्हणुन त्याने हा मृतदेह तेथेच टाकून दिला.

त्यावर डिझेल टाकुन जाळून टाकले अशी कबुली त्याने दिली. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस करत आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली, मपोउपनिरी/जेजोट, ग्रेडपोसई/कानगुडे, चालक स.फौ.इथापे, पोहेकाँ/धामणे, पोहेकाँ/मरकड, पोहेकाँ/गोरे पोकाँ/सातपुते, पोकाँ/ गायकवाड, यांनी सदरची कारवाई केली आहे.

सुपा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव !
सुपा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ दिवटे यांच्या नेतृत्वाखाली सुपा पोलिसांनी महिनाभराच्या आत सदर घटनेचा उलगडा करत आरोपीचा शोध घेत आरोपीला अटक केली आहे. सुपा पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...