अहमदनगर । नगर सहयाद्री-
संचालक मंडळांच्या संगनमतीने बँकच्या खातेदारांची ९ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नगर शहरातील नामांकित बँकमध्ये घडला आहे.
खातेदार राहुल भास्कर शिंदे, (वय ३८ वर्षे, रा. लिंक रोड, नालेगाव, जि. अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून चेअरमन नुतन पवार (रा. ड्रीमसिटी, नगर कल्याण रोड, जि.अहमदनगर), व्हाईस चेअरमन प्रिया बेरड (रा. पाईपलाईन रोड, जि. अहमदनगर), मॅनेजर सागर टकले (रा. पाईपलाईन रोड, जि. अहमदनगर) तसेच यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांनी नगर कल्याण रोडवरील धर्नादय अर्बन निधी लिमिटेड को-ऑपरेटीव्ह बँकेमध्ये मुदत ठेव म्हणून ६ लाखाची एका वर्षासाठी गुंतवणूक केली होती. तसेच १९ नोव्हेंबर २०२२ रोजी १ लाख ५० हजार रुपयांची अशी एकूण ९ लाख ५१ हजार रुपयांची एका वर्षाकरीता गुंतवणूक केली होती.
मुदत ठेवीची कालावधी संपल्यानंतर फिर्यादी गुंतवणूक केलेल्या रक्कमेची मागणी करण्यासाठी बँकेत गेले असता बँकेचे चेअरमन नुतन पवार, व्हाईस चेअरमन प्रिया बेरड, मॅनेजर सागर टकले यांनी फिर्यादीला गुंतवणूक केलेली रक्कम देण्यास टाळाटाळ करत संचालक मंडळाच्या संगनमताने फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.