spot_img
ब्रेकिंग'फ्रॉड हैं सनी देओल' कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा अभिनेत्यावर आरोप? संपूर्ण प्रकरण वाचा...

‘फ्रॉड हैं सनी देओल’ कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा अभिनेत्यावर आरोप? संपूर्ण प्रकरण वाचा एका क्लिकवर..

spot_img

Sunny Deol News: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजे सनी देओलची ओळख आहे. सनी देओलवर अभिनेता सनी देओल अडचणीत आला आहे. त्याच्यावर आता फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. एका प्रसिद्ध निर्मात्याने इंडिया टुडेशी बोलताना सनी देओलवर आरोप केला आहे.

अधिक माहिती अशी: सनडाउन एंटरटेंनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मालक, रिअल इस्टेट डेव्हलपर सौरव गुप्ता यांनी हे आरोप केले आहेत. सनी देओललला त्याच्या चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट दाखवण्यात आला. त्यानंतर सनी देओलने ४ कोटी रुपयांचे मानधन घेऊन चित्रपट करण्यास होकार दिला. त्यानंतर सनी देओल १ कोटी रुपये अॅडव्हान्स दिले होते. परंतु अभिनेत्याने शुटिंग सुरुच केले नाही, असं सौरव गुप्ता यांनी सांगितले आहे.

सनी देओलने चित्रपटासाठी अॅडव्हान्स पैसे घेतले परंतु तो चित्रपटाच्या शुटिंगला आलाच नाही. याउलट तो पोस्टर बॉईज या चित्रपटाच्या शुटिंगसाठी गेला, असा दावा सौरव गुप्ता यांनी केला आहे.सौरव गुप्ता यांनी सांगितले की, २०२२ मध्ये या चित्रपटाबाबत बोलणी झाली आहे. त्यानंतर सनी देओलने आम्हाला सांगितले की, तुम्ही चित्रपटाचा दिग्दर्शक बदला आणि स्क्रिप्टवर पुन्हा एकदा काम करा. परंतु २०२३ मध्ये सनी देओलनेच आम्हाला ही आयडिया सुचवली होती. या चित्रपटाचे नाव ‘रामजन्मभूमी’ असे असणार होते. चित्रपटाचे एकूण बजेट ४० कोटी रुपये असणार होते.

‘रामजन्मभूमी’ या चित्रपटाचे शुटिंग फिल्मीस्तान या स्टुडिओमध्ये होणार होते. दिग्दर्शक आणि सेटवरील अनेक लोकांना पैसे देण्यात आले. सनी देओलने चित्रपटात काम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नंतर स्वतः ची फी वाढल्याचे सांगितले. त्यामुळे चित्रपटातून जी कमाई होईल त्यातून दोन कोटी रुपये मिळती असा करार झाला होता, असा दावा सौरव यांनी केला आहे.

सनी देओलने मुलगा करणच्या लग्नासाठी ५० लाख रुपये मागितले होते. या चित्रपटातून निर्मात्यांना खूप फायदा होईल, असं त्याने सांगितले. त्यामुळे आम्ही त्याला ५० लाख रुपये दिले असल्याचे देखील म्हंटले आहे. चित्रपटाचा संपूर्ण करार झाला. त्यानंतर हार्ड कॉपी समोर येताच आम्हाला धक्का बसला. त्यात सनी देओलने नफ्यातून २ कोटी रुपयांसह त्याचे मानधन वाढवून ८ कोटी रुपये केले होते. याशिवाय आणखी १ कोटी रुपये द्यावे लागतील असे देखील सौरव गुप्ता यांनी यांनी सांगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...