सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील सुपा शहरालगत बिबट्या मागून बिबटे जेरबंद करण्यात वनविभागासह सुपा ग्रामपंचायत व नागरिकांच्या सहकार्याने यश येत असून एका महिन्यात तब्बल चौथा बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. एकाच शहरात किंवा गावात इतया मोठ्या प्रमाणात बिबटे जेरबंद करण्याची ही पहिलीच घटना असल्याची माहिती सरपंच मनीषाताई योगेश रोकडे यांनी दिली.
जिजाबा गवळी वस्ती येथे २४ दिवसांपूर्वी वन विभागाने लावलेल्या पिंजर्यात शनिवार ०६ सप्टेंबर रोजी पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान एक बिबट्या जेरबंद झाला होता. त्याचदरम्यान दुसर्या बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे आणखी दोन पिंजरे लावण्यात आले, एक जांभूळ ओढा व दुसरा शितारा बिल्डिंगच्या पाठीमागे असे दोन पिंजरे लावण्यात आले होते. बिबट्या लोकवस्तीत शिकल्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. आठ दिवस योग्य ती खबरदारी घेऊन ग्रामस्थांनी रात्रंदिवस बिबट्यापासून बचाव कसा होईल याची काळजी घेतली. मंगळवार १६ रोजी पहाटे पाच वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळवाडी, शितारा बिल्डिंगच्या पाठीमागे ठेवलेल्या पिंजर्यात दुसरा बिबट्या अलगद अडकला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. यावेळी बिबट्याला पहाण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली.
दरम्यान गुरुवार १८ सप्टेंबर रोजी सुपा येथील डोंगरवाडी येथील ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले. तेेथील ग्रामस्थांनी सुपा गावचे सरपंच मनीषा रोकडे, उद्योजक योगेश रोकडे, माजी उपसरपंच सागर मैड, माजी उपसरपंच दत्तानाना पवार यांना याबाबत कल्पना दिली. सरपंच मनीषाताई रोकडे यांनी वनविभागाला कळाल्यानंतर वनविभागाच्या वतीने डोंगरवाडी येथील ज्या शेतकर्याची शेळी खाल्ली त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला, दुसरी शिकार करण्यासाठी मंगळवार २३ सप्टेंबर रोजी पहाटे ०५:३० वाजता बिबट्या त्या ठिकाणी आल्यानंतर अलगद त्या पिंजर्यात अडकला.
सुपा शहरात मुख्य चौकात बिबट्याचा वावर दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकर्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. बिबट्या मागून बिबटे जेरबंद झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी वन विभागाने ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी सावध राहण्याचा आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
सुपा डोंगर वस्ती येथील बाबाजी पवार यांची शेळी दोन दिवसांपूर्वी बिबट्याने फस्त केली. त्याठिकाणी गोठ्याजवळच वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला. त्यात उद्योजक योगेश रोकडे यांनी स्वतः बिबट्याचे खाद्य म्हणून बोकड ठेवले. बिबट्या दुसर्यांदा सोमवार २९ रोजी पहाटे ०५ वाजता त्या ठिकाणी आला आणि अलगद पिंजर्यात अडकला.