अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
बिरोबा यात्रेनिमित्त यात्रेनिमित्त कावडी घेऊन येणाऱ्या तरुणाच्या अंगावर चार चाकी वाहनाने जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी पांढरी पूल येथे घडली.
नेप्ती (तालुका नगर) येथे श्रीक्षेत्र बिरोबा महाराजांची रविवार दिनांक चार रोजी यात्रा आहे. या यात्रेनिमित्त गावातील कावडीधारक बिरोबा महाराजांना अभिषेक करण्यासाठी प्रवारासंगम येथून पाणी आणायला गेले होते. हे कावडी धारक रात्री पायी पायी चालत असताना पांढरीपूल रिसरात इरटीका वाहनाने जोराचे धडक दिली.
यामध्ये नरेश जपकर (वय -40 ) हा तरुण जागीच ठार झाला. कादर शेख, इस्माईल शेख व राहुल कांडेकर हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. या दुर्घटनेमुळे बिरोबा महाराजांची यात्रा व अन्य धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.