spot_img
ब्रेकिंगअनैतिक संबंधातून युवकाचा खून, आहिलयनगरच्या तीन तालुक्यातील चौघांनी 'असा' रचला प्ल्यान!

अनैतिक संबंधातून युवकाचा खून, आहिलयनगरच्या तीन तालुक्यातील चौघांनी ‘असा’ रचला प्ल्यान!

spot_img

Ahilayanagar Crime: अनैतिक संबंधातून युवकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. आहिलयनगर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील चौघांनी हत्या करण्याचा प्ल्यान रचला असल्याची माहिती समोर आली आहे. रंजीत सुनील गिरी ( वय 23. वर्ष रा गांधीनगर, बीड) असे हत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष बाबुराव जाधव ( रा. खांडवी, ता.कर्जत ) ऋषिकेश रवी बोरकर ( रा. वडझिरे ता. पारनेर) उद्धव उर्फ संतोष अण्णासाहेब मांडगे ( रा. आढळगाव ता. श्रीगोंदा ) आणि खांडवी येथील एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

कर्जत तालुक्यातील नांदगाव शिवारामध्ये 23 डिसेंबरला कुकडी कालव्याच्या पाण्यावर मतदेह तरंगत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाचे कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. मयत युवकाच्या गळ्याभोवती जखम व फाशी दिल्यासारखा व्रण आढळला.

जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली. बीड येथे राहणारा रणजीत सुनील गिरी हा हॉटेल आणि ढाब्यावर आचारी म्हणून काम करत होता. मात्र मागील अनेक दिवसांपासून तो गायब होता. घरच्यांची संपर्क केल्यावर फोनवरून तो मी व्यवस्थित आहे असे सांगत होता. त्यामुळे तो कुठेतरी ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये काम करत असेल असे घरच्यांना वाटत होते.

दरम्यान, मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांनी तात्काळ पूर्वीच्या असलेल्या गुन्ह्याशी काही धागेदोरे जुळतात का याचा अंदाज घेत यातील काहीजणांना ताब्यात घेतले. आणि विशेष चौकशी केल्यानंतर यातील आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. रंजीत हा संबंधित मुलीचे लग्न झाल्यानंतर देखील तिच्याशी फोनवरून संपर्क करत होता. हे त्या मुलीच्या पतीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब मुलीच्या आई-वडिलांना सांगितली.

त्यांनी मुलीस अनेक वेळा समजून सांगितले मात्र काही बदल होत नसल्यामुळे अखेर त्यांनी रंजीत गिरी यास संपवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानुसार या मुलीच्या आईने सर्व नियोजन केले आणि जावई मुलीचे वडील आणि त्यांचे ओळखीचे एक जण या सर्वांनी मिळून रणजीत यास गोड बोलून विश्वासात घेतले. त्याला आढळगाव शिवाराच्या परिसरामध्ये गाडीमध्ये आणतानाच मारहाण केली. यानंतर त्याचा दोरीने गळा आवळला आणि खून करून त्याचा मृतदेह पाण्यामध्ये फेकून दिला असल्याची माहिती उजेडात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेर शहरातील कार्यकर्त्‍यांना मंत्री विखे पाटलांचा महत्वाचा संदेश; तयारी सुरु करा! आता शहरात विकासाची गंगा..

संगमनेर । नगर सहयाद्री: आ.अमोल खताळ यांच्‍या विजयाने तालुक्‍यात परिवर्तन होवू शकते हा विश्वास...

पालकमंत्रिपदावरून ताणाताणी; महायुतीत कोण-कोण नाराज?

मुंबई | नगर सह्याद्री:- महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून सरकारमधील तिन्ही पक्षात कमालीची अस्वस्थता दिसून येत...

संतोष देशमुख हत्त्या प्रकरणी खा. बजरंग सोनवणे संतापले; ५ मोठ्या मागण्या कोणत्या?

बीड | नगर सह्याद्री बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात...

सावकारी टोळक्यांची दादागिरी; बंद पाडले व्यावसायिकचे दुकान, अहिल्यानगर शहरातील धक्कादायक प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या टोळक्यांनी व्याजापोटी दहशतीने दुकान बंद करुन, सातत्याने...