spot_img
अहमदनगरएका कुटुंबातील चार जणांचा अपघातात मृत्यू!; 'या' शिवारात मध्यरात्री घडली घटना

एका कुटुंबातील चार जणांचा अपघातात मृत्यू!; ‘या’ शिवारात मध्यरात्री घडली घटना

spot_img

Accident News : वर्ध्यामध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. डुक्कर आडवे आल्यामुळ कारचे नियंत्रण सुटले अन् टँकरला धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय. अपघात इतका भीषण होता की माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. उपचारावेळी बाप-लेक दगावले. वर्धा येथील समुद्रपूर वर्धा मार्गावरील तरोडा शिवारातील मध्यरात्री १ वाजता हा अपघात झाला.

अपघातात जखमी झालेल्या वडिलांना नागपूरला आणि मुलीला सेवाग्राम येथे उपचरासाठी दाखल केले होते. पण उपचारावेळी दोघांचीही प्राण ज्योत मालवली. प्रियंका प्रशांत वैद्य (वय 37), प्रियांश प्रशांत वैद्य (वय 8 वर्ष ), प्रशांत मधुकर वैद्य (43 वर्ष ) व माही प्रशांत वैद्य (3 वर्ष ) अशी मृतकांची नावे आहेत. प्रशांत मधुकर वैद्य हे कारने वर्ध्याला येत होते, त्यावेळी रात्री एक वाजताच्या आसपास अपघात धाला.

वैद्य यांच्या कारला अचानक डुक्कार धडकले त्यामुळे कारवरील ताबा सुटला. कार थेट जाऊन टँकरला धडकली. या अपघातामध्ये प्रियंका आणि प्रियांश यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेले प्रशांत वैद्य आणि माही यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. कारचालक प्रशांत वैद्य हे पोलीस कर्मचारी आहेत. ते वर्धा येथील वडनेर ठाण्यात कार्यरत होते.

ते कुटुंबासोबत कारने तरोडा गावाजवळून कारने वर्धेला निघाले होते. त्यावेळी अचानक कारसमोर डुक्कर आडवे आले. डुकराला कारची धडक लागून कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरला जाऊन धडक दिली. घटनेत घटनास्थळीच पत्नी व मुलाचा मृत्यू झालाय तर कारचालक पती व मुलगी गंभीर जखमी झाली होती. त्यांना सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे मुलीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला तर वडिलांचा नागपूरच्या एम्स रुग्णालयात मृत्यू झाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...