श्रीगोंदा पोलिसांची कामगिरी; पाच लाख रुपये किमतीची वाहने जप्त
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पैशासाठी लग्नाचा बनाव करणार्या सराईत चार आरोपींना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींकडून पाच लाख रुपये किमतीची सुझुकी व एक व्हॅन जप्त करण्यात आली. श्रीगोंदा पोलीस ठाणे गु. रजि. नं. ०८३८/२०२४ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३१८(४), ३०३(२),३(५) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
नवरीची बनावट भूमिका करणारी एक महिला आरोपी, नवरीच्या बहिणीची भूमिका करणारी एक महिला व नवरीच्या दाजीची भूमिका करणारा इसम विठ्ठल किसन पवार (वय ३७ वर्ष रा. महालक्ष्मी खेडा पो. सावखेडा जिल्हा छत्रपती संभाजीनगर) नवरीच्या काकाची भूमिका करणारा आरोपी ज्ञानेश्वर लक्ष्मण दाभाडे (वय ४५ वर्षे, रा. धुपखेडा ता. पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असे आरोपी आहेत.
तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्याने संबंधित आरोपींना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून सापळा रचून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अन्य साथीदारांचा सहभाग यात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचा शोध सुरू आहे. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी इको व्हॅन जप्त करण्यात आली आहे. आरोपींंना १६ सप्टेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली असून त्यांना १७ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा कोर्टात हजर केले असता त्यांना सात दिवस पोलिस कोठडी रिमांड मिळाली आहे. या तपासात दक्षिण मोबाइल सेल नेमणुकीचे पोकॉ राहुल गुंड व पोकॉ नितीन शिंदे यांची मदत मिळाली. गुन्ह्याचा पुढील तपास पोना श्री. इंगवले हे करीत आहेत.