spot_img
अहमदनगरनागरे ज्वेलर्स फोडणारे चौघे ताब्यात!; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

नागरे ज्वेलर्स फोडणारे चौघे ताब्यात!; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

spot_img

श्रीरामपूर। नगर सहयाद्री 
श्रीरामपूर येथील प्रसिद्ध रामभाऊ सोपान नागरे ज्वेलर्स फोडणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना येथून अटक केली आहेत. आरोपींकडून ११ किलो २३० ग्रॅम चांदी, तसेच सोन्याचे दागिने, कार व मोबाईलसह एकूण १४ लाख ७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सराफा व्यावसायिक निखील नागरे यांनी फिर्याद दिली होती.

दिनांक १७ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर फोडून कपाटातील २६ लाख ५९ हजार रुपये किंमतीचे मौल्यवान दागिने लंपास केले होते. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास सुरु केला. पथकाने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता सदरचा गुन्हा आरोपी नमूद गुन्हा गोपीसिंग टाक, शिवाजी प्रल्हादराव सासनिक, दोघे (रा.जालना ) यांनी साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले.

पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे २२ जुलै रोजी जालना येथुन गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक, दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक,दोघे (रा.सिध्दार्थनगर, ता.जि.जालना ), शिवाजी प्रल्हादराव सासनिक ( रा.रेणुकामाता मंदिराजवळ, गांधीनगर, जालना), अमित नंदलाल दागडिया (रा. खरपुडी रोड, हरीगोविंदनगर, जालना ) अशांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा कंपनीची कार, ५ मोबाईल, ११ किलो २३० ग्रॅम चांदी, ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने असा एकूण १४ लाख ७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्तकरण्यात आला आहे. ताब्यातील आरोपी दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक याच्याविरोधात जालना जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे १४ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई/ अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, भगवान थोरात, रमीजराजा आत्तार, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड व महादेव भांड यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं सावट! पुढील काही दिवस पावसाचे, IMD इशारा..

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं संकट आलं आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ आणि...

सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट; आई-वडिल समोर, पोलीस अन् राजकीय दबावावर भाष्य

सातारा / नगर सह्याद्री - जिल्ह्यातील फलटण येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या...

ट्रस्ट जमीन प्रकरणी जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, अशा आहेत मागण्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त...

क्षुल्लक कारणावरून महिलेवर चाकूहल्ला; नगरमध्ये धक्कादायक प्रकार

भावासह कुटुंबालाही मारहाण | बुरूडगाव येथील घटना अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुयातील बुरुडगाव येथे मला...