spot_img
देशमाजी खासदाराच्या PA ची भररस्त्यात हत्या, तलवारीने पाडले तुकडे

माजी खासदाराच्या PA ची भररस्त्यात हत्या, तलवारीने पाडले तुकडे

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
पंजाबच्या लुधियानामधून एक हादरवाणारी बातमी समोर आली आहे. मध्यरात्री माजी खासदाराच्या पीएची हत्या करण्यात आली आहे. चाकूने सपासप वार करत जीव घेतला. हा थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शिरोमणी अकाली दल पक्षाचे माजी खासदार जगदेव सिंह तलवंडी यांचे पीए कुलदीप सिंह मुंडिया यांची शुक्रवारी मध्यरात्री हत्या करण्यात आली. तलवारीने सपासप वार करत त्यांचे तुकडे करण्यात आले.

फार्महाऊसमधून कुलदीप सिंह मुंडियां शुक्रवारी रात्री उशिरा कारने बाहेर निघाले होते. रस्त्यात त्यांना आरोपींनी घेरलं अन् जबरदस्तीने बाहेर खेचलं. त्यानंतर पाच ते सहा जणांनी तलवारीने त्यांच्यावर सपासप वार केले. जोपर्यंत कुलदीप यांचा मृत्यू होत नाही, तोपर्यंत आरोपींनी सपासप वार केले. कुलदीप यांचे हात-पाय धडापासून वेगळं करत त्यांचा निर्घृण खून केला.

आरोपीवर तलवारीने सपासप वार, लोकांची बघ्याची भूमिका –
धक्कादायक म्हणजे, कुलदीप यांच्यावर आरोपी सपासप वार करत होते, तेव्हा आजूबाजूला लोक ये-जा करत होते. पण कोणत्याही व्यक्तीने आरोपींना अडवण्याची हिंमत केली नाही. कुलदीप सिंह यांनी मदतीसाठी आरडाओरड केला. भीतीमुळे पण एकजणही धावला नाही. एका व्यक्तीने हिंमतीने या घटनेचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पंजाब आणि लुधियानामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

कुलदीप यांची निर्घृण हत्या केल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांनी दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत आरोपींनी पळ काढला होता.घटनेचा व्हिडिओ शूट करणाऱ्या तरूणाने आपल्याकडील फुटेज पोलिसांना दिले. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा कऱण्यात आला. त्यानंतर मतदेह पोस्टमार्टमासाठी पाठवण्यात आला. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी कॅनडामध्ये राहणाऱ्या कुलदीप सिंह यांच्या कुटुंबीयांना या हत्याकांडाची माहिती दिली आहे. कुलदीप सिंह यांचा कोणाशी वाद होता, त्यांच्या हत्येचे कारण काय? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. कुलदीप सिंह प्रॉपर्टी व्यवसायात कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी ते कॅनडाला गेले आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबही तिथेच स्थायिक झाले. कॅनडात काही काळ घालवल्यानंतर ते पुन्हा लुधियानाला परतले आणि एकटेच राहत होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरचे माफिया राज रोखण्यासाठी निवडणूकीत महायुतीला पाठबळ द्या : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निघोज / प्रतिनिधी रेडबुलचा वापर करुण पारनेरचा माफियाराज माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दादागीरीला सामोरे जावे लागत...

अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

कोल्हापूर / नगर सह्याद्री : राज्य पातळीवर शरद पवार आणि अजित पवार गट वेगवेगळे असले...

निवडणुकीची रणधुमाळी! उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात; आघाडी-युतीचे तळ्यात मळ्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पालिकांसाठी हालचाली  अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील 12 पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला...

अरणगाव शिवारात दोन गटात राडा; लोखंडी गज, काठीने मारहाण, वाचा प्रकरण?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील शिंदे मळा परिसरात दोन गटात शेतीच्या...