spot_img
अहमदनगरमाजी खासदार विखेंची याचिका; खासदार लंकेंना कोर्टाने धाडली नोटीस, वाचा सविस्तर..

माजी खासदार विखेंची याचिका; खासदार लंकेंना कोर्टाने धाडली नोटीस, वाचा सविस्तर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
अहमदनगर लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले उमेदवार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांच्या प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे.

काल मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती संत यांनी प्रतिवादी नीलेश लंके यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेत, नीलेश लंके यांची निवड रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुढील सुनावणी २ सप्टेंबरला होणार आहे.

माजी खासदार सुजय विखे यांनी अॅड. आश्विन होन यांच्या मार्फत दाखल केलेल्या याचिकेत काही मतदान केंद्रांवरील मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आले आहेत. संबंधित ४० ते ४५ केंद्रांवरील मतमोजणी योग्य पद्धतीने झालेली नसल्याचा दावा आहे. निवडणूक आयोगाकडे फेरपडताळणीची मागणी केली आहे.

तसेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नीलेश लंके आणि त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे विखे पाटलांची खोटी बदनामी करणारी असल्याचा आरोप आहे. नीलेश लंके यांनी दाखवलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्ष खर्च यात ताळमेळ नाही.

मुद्रित प्रचार साहित्याचा खर्च दाखवलेला नाही. त्यामुळे लंके यांनी दाखवलेल्या निवडणुकीतील खर्चातील नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे याचिकेत नमूद केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जाऊ नका!; पक्ष सोडण्याची भाषा करणाऱ्यांना राठोड यांचा टोला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिक हे एकनिष्ठ आहेत. कोणीही तुटणार...

तनपुरे यांना पराभव अमान्य! इव्हीएम पडताळणीसाठी अर्ज

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम पडताळणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरीतील उमेदवार...

सहाव्या विजयानंतर आमदार कर्डिले म्हणाले, जनतेचे माझ्यावर जीवापाड प्रेम, मंत्री असो नसो..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- गेल्या 30 वर्षांपासून जनतेने माझ्यावर जीवापाड प्रेम केले आहे. त्यामुळे विधानसभा...

हुडहुडी कायम! नगरचे तापमान पुन्हा घटले; हवामान खात्याने दिला इशारा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून अहिल्यानगरचे...