spot_img
अहमदनगरमाजी आमदार बाळासाहेब मुरकुटे भाजपा सोडणार!

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे भाजपा सोडणार!

spot_img

नेवाश्याची जागा राष्ट्रवादीकडे घ्या मी प्रवेश करतो; अजित पवार यांना घातले साकडे

एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य उमेदवारला मुरकुटे यांचा विरोध

नगर सह्याद्री |नेवासा

नेवासा विधानसभेची जागा शिंदे यांच्या शिवसेनेला गेली असून एका मोठ्या उद्योग्यपतीचे नाव नक्की झाले असताना त्या विरोधात भाजपच्या माजी आमदाराने बंड पुकारले आहे. भाजपच्या नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर देखील ही जागा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली. त्यानंतर मुरकुटे यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे वळविला.

शनिवारी संध्याकाळी अजित दादा यांच्या भेटीला ते एकटे गेले व जागा राष्ट्रवादीने घेतल्यास मी भाजपला राम राम करतो व राष्ट्रवादी मधे प्रवेश करतो अशी खुली ऑफर त्यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझ्या सोबत आहे असेही सांगितले. त्या प्रमाणे रविवारी विठ्ठलराव लंघे यांच्या समवेत शिष्ट मंडळ अजित पवार यांच्या भेटीला घेऊन गेले.
शिवसेनेने जाहीर केलेला उमेदवार हा नवखा असून त्यांना तालुक्यातील गावे माहीत नाही, कार्यकर्ते माहीत नाही, ते कधीही लोकांच्या सुख दुःखात नसतात, तालुक्यातील जनता त्यांना ओळखत नाही अशा तक्रारी या दोघांनी केल्या. मला राष्ट्रवादी कडून उमेदवारी द्या अशी जाहीर मागणी माजी आमदार मुरकुटे यांनी केली. त्यावर अजित दादा म्हणाले की, मी सकारात्मक पाहतो.

आमदार शंकरराव गडाख यांच्या विरोधातील सर्व इच्छुक मुंबईत ठाण मांडून असून आपणच कसे योग्य आहोत हे नेत्याना पटून देत आहे. आता नेवासाची जागा महायुतीत कुणाला मिळते याकडे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....