Madhukar Pichad: महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदिवासी समाजाचे नेते, भाजपा नेते, माजी मंत्री मधुकर पिचड यांची प्राणज्योत मालवली. ते ८४ वर्षांचे होते. गेले दिड महिन्यापासून ते बेनस्ट्रोक मुळे आजारी होते. मधुकर पिचड यांच्यावर नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात उपचार सुरू होते. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.
राजूर येथील काशिनाथ पिचड या प्राथमिक शिक्षकाचा घरात त्यांचा जन्म झाला. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालय त उच्च शिक्षण घेऊन मधुकराव पिचड हे तालुक्याच्या राजकारणात आले. मधुकरराव पिचड यांची 1972 ला अकोले जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाली.
1972 ते 1980 या काळात ते पंचायत समितीचे सभापती होते. 1980 ते 2009 असे सलग 7 वेळा आमदार झाले. विविध खात्यांची जबाबदारी पाडली पार मधुकरराव पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास, पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली होती. 1995 ते 1999 या काळात त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सांभाळले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक सदस्य तसेच प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही पिचड यांनी धुरा सांभाळली होती. मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिला .महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मधुकर पिचड यांचं नाव आदराने घेतलं जातं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप असा पिचड यांचा राजकीय प्रवास होता. त्यांच्यावर आदरांजली वाहत अनेक नेत्यांनी दुख: व्यक्त केलं.