Maharashtra Crime News: माजी नगरसेविकेच्या मुलाने एका तरुणीवर प्रेमसंबंधाच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिला गर्भपातासाठी भाग पाडल्याची खळबळजनक घटना घडली. पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी तरुण आणि पीडित तरुणीची 2021 साली एका व्यायामशाळेत ओळख झाली होती. सुरुवातीला मैत्री झाल्यानंतर, आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. काही काळ तो तिच्या घरी येत-ज्यात होता. मात्र जेव्हा तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तसेच त्याचे इतर तरुणींशी संबंध असल्याचा संशय पीडितेला आला होता.
पीडित तरुणीने जेव्हा त्याच्यावर अन्य संबंधांबाबत विचारणा केली, तेव्हा आरोपीने तिला शिवीगाळ केली आणि मारहाण करून धमकावले. त्यानंतर तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले. मात्र, त्याआधी झालेल्या लैंगिक संबंधांमुळे ती गरोदर राहिली होती. आरोपीने या प्रकरणात तिला धमकावून गर्भपात करण्यास भाग पाडले, असे तिच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.