spot_img
अहमदनगरमाजी आ. विजय औटी भूमिका जाहीर करणार!

माजी आ. विजय औटी भूमिका जाहीर करणार!

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
माजी आमदार व शिवसेनेचे उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते विजय औटी यांनी आज मंगळवारी सकाळी पारनेरमध्ये तालुक्यातील निवडक शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक घेतली आणि लोकसभा निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांची भूमिका समजावून घेतली. या चर्चेचा तपशिल समजू शकला नाही. मात्र, सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि. १ मे रोजी पारनेरमध्ये काय भूमिका घ्यायची याबाबत घोषणा करु असे विजय औटी यांनी जाहीर केले.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पारनेर शिवसेनेकडून कोणतीच भूमिका घेतली गेली नाही. निवडणुक जाहीर झाली आणि त्याचवेळी विजय औटी हे आजारी पडले. काही दिवस हॉस्पिटल आणि त्यानंतर घरी आराम केल्यानंतर त्यांना बरे वाटू लागले. लोकसभा निवडणुकीबाबत आपण आपली भूमिका जाहीर केली पाहिजे अशी मागणी कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांकडून झाल्यानंतर औटी यांनी आज मंगळवारी निवडक पदाधिकार्‍यांची बैठक घेतली.

सर्वांची भूमिका समजावून घेत विजय औटी यांनी सर्वांच्या सहमतीचा निर्णय आपण दि. १ मे रोजी जाहीर करू आणि हाच आपणा सर्वांचा निर्णय असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, औटी यांची भूमिका नगर लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याने ते काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...