अहमदनगर | नगर सह्याद्री
मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून भरपुर निधी मिळाला असून जिल्ह्याच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. नगर येथील देहरे गावातील प्रचारसभेत ते बोलत होते.
सुजय विखे पाटील आणि जिल्ह्यात आणलेला निधी आमि त्यातून झालेल्या यांनी विकास कामांच्या जोरावर मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. डॉ. विखे पाटील यांच्यासह या बैठकीला जिल्हाबँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, देहरे गावच्या सरपंच नंदाताई भगत, ऱभाजी सुळ, अंबादास काळे, रमेश काळे, केशवराव अडसुरे,सुनिल जाधव, संजय बाचकर व इतर प्रमुख स्थानिक नेते उपस्थित होते.
सुजय विखे पाटील म्हणाले की, विकास हाच माझा अजेंडा असून त्यासाठी मी सदैव कटीबद्ध आहे. मागील पाच वर्षात मी केलेल्या कामांचा आढावा घ्या, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची जिल्ह्यात झालेली प्रभावी अंमलबजावणी ही आपल्या जमेची बाजू असून शेवटच्या लाभार्थांपर्यंत योजनेचा लाभ पोहचला आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यात लवकरच तीन नव्या एमआयडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. मोठ मोठे उद्योग जिल्ह्यात येणार आहे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्याच्या विकासासाठी माझ्याकडे ध्येय आणि धोरणे आहेत. यामुळे येणार्या काळात जिल्ह्यातील प्रमुख प्रश्नांची यादी तयार असून त्यांना मार्गी लावण्यासाठी आपण अविरत प्रतत्न करू असे विखे पाटील यांनी सांगितले. आपल्या विकास कामांची माहिती देत असताना त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वनेता म्हणुन गौरव करत. मागील दोन दशकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्वाधिक कल्याणकारी योजना राबविल्या.
देशाच्या आर्थिक धोरणाला चालना दिली, आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करत देशाला जगात किर्ती मिळवून दिली. त्यामुळे देशात केवळ मोदीपर्वाचीच हवा असून पुन्हा एकदा त्यांच्या रुपाने एक मजबूत नेतृत्व देशाला मिळणार आहे. यामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान मोदींना साथ द्या असे आवाहन सुद्धा त्यांनी मतदारांना केले आहे.
सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, निवडणुकीला कमी दिवस राहिले असल्याने विरोधक खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणार आहेत. बिनबुडाचे आणि खोटे आरोप करतील. त्यांनी तुम्ही कोणतेही प्रतिउत्तर न देता केवळ आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहचवा. विजय केवळ आपलाच आहे. त्यात फक्त आपले मताधिय कसे वाढेल यावर भर द्या असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना देत त्यांच्यात उर्जा भरली.