राहुल जगताप यांच्यासाठी काष्टीत प्रचारफेरी
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
महाविकास आघाडीच्या तिकिटाचे दावेदार राहुल जगताप हेच होते, पण त्यांचे तिकीट पळविले गेले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू आले. या अश्रूची फुले करण्यांसाठी माझे पती राहुल जगताप हे मैदानात उतरले आहेत. आता विजयाची फुले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या चरणी अर्पण करणार असल्याचे कुकडी साखर कारखान्याच्या संचालिका डॉ. प्रणोती जगताप यांनी सांगितले.
तालुयातील आढळगाव, काष्टी, चिंचोडी पाटील येथे मंगळवारी आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या. डॉ. जगताप म्हणाल्या, कुकडी साखर कारखान्याला भाजपचे नेते केंद्र सरकारचे कर्ज देत होते. आम्ही उद्या काहीही झाले तरी पवार साहेबांना सोडायचे नाही, असा निर्णय घेतला होता. मुंबईच्या राजकीय बाजारात निष्ठवर पैशाने मात केली. पाचपुते गावोगावी सांगतात की, आम्ही विकास केला. मग विकास का दिसत नाही, निधी कुठे गेला, असा सवाल जगताप यांनी केला.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शुभांगी पोटे म्हणाल्या, आम्ही महाविकास आघाडीच्या खन्या उमेदवाराबरोधर राहण्याचा निर्णय घेतला. पदे येतात जातात, पण राजकारणात नीतिमत्ता राहिली नाही. त्यामुळे आम्ही कसलाच विचार न करता राहुल जगताप
यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीच्या उपसभापती मनीषा मगर म्हणाल्या, राहुल जगतीप हे धनात कमी आहेत, मात्र निवडणुका जिंकण्यात माहिर आहेत. ते ही निवडणूक
जिंकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शुभांगी पोटे, कल्याणी लोखंडे, मीना आढाव, आशा उगले, मीनाक्षी सकट आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.