श्रीगोंदा | नगर सह्याद्री
विधानसभा निवडणुकीत श्रीगोंद्यातील गावांमधून मिळणार्या मताधिक्यापेक्षा नगर तालुक्यातील गावांमधून विक्रमसिंह पाचपुते यांना जास्तीचे मताधिक्य मिळेल असा विश्वास नगर तालुक्यातील गावनिहाय बैठकांमधून युवकांनी व्यक्त केला. विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांच्या प्रचार फेर्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.
पाचपुते यांच्या प्रचारार्थ बारादरी, मेहेकरी, पिंपळगाव लांडगा, पारेवाडी, पारगाव भातोडी आदी भागात प्रचार फेरी काढण्यात आली. या वेळी भाजप नेते भूषण बडवे, सचिन भोस, भाऊसाहेब मांडे, सुभाष निमसे, बाबासाहेब काळे. सरपंच अमोल गुंड, महेश वाघ, दत्तात्रय मोहिते, प्रवीण नागवडे, संकेत जंजिरे, सरपंच सुधीर पोटे, अशोक पोटे, अर्जुन बडे, नवनाथ राठोड, बाळासाहेब गर्जे आदींसह विविध गावातील सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी रतडगावचे माजी सरपंच दत्तात्रय मोहिते म्हणाले की, आ. बबनराव पाचपुते यांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात या भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मागील पाच वर्षांत विक्रम यांनी या भागात कोट्यवधींचा निधी आ. पाचपुते यांच्या माध्यमातून देण्याचे काम केले आहे. दशमीगव्हाणचे सरपंच बाबासाहेब काळे म्हणाले की, विकास करायचा असेल तर पाचपुतेच आमदार पाहिजेत मतदार संघात मुंबईत बसून निधी मिळवण्याची हातोटी विक्रम यांचेत आहे तर अशोक पोटे म्हणाले की, या भागातून पाचपुते यांना नेहमीच मोठे मताधिय देण्यात आले असून, यंदा आम्ही श्रीगोंदा तालुयापेक्षा मोठे मताधिय विक्रम पाचपुते यांना देणार आहोत, असे सांगितले. या वेळी दशमीगव्हाणचे सरपंच बाबासाहेब काळे यांनी मनोगत व्यक्त केले.