spot_img
ब्रेकिंगलाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र; कारण आलं समोर..

लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र; कारण आलं समोर..

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेचा कोट्यवधी महिलांनी लाभ घेतलेला आहे. या योजनेत आतापर्यंत जवळपास 5 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. अपात्र महिलांना आता यापुढे हप्ता मिळणार नाही.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता अपात्र महिलांना जानेवारीपासूनचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे आता जवळपास 5 लाख महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. पडताळणी झाल्यावर अपात्र महिलांकडून दिलेला लाभ परत घेणार का असाही प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र, या योजनेतून कोणत्याही महिन्याचे पैसे परत घेतले जाणार नसल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना खात्यात यापूव जमा करण्यात आलेला निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणून कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै 2024-डिसेंबर 2024) देण्यात आलेली रक्कम   परत घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. महिलांच्या घरी चारचाकी वाहने आहेत की नाही याची तपासणी घरोघरी जाऊन केली जाणार आहे. याचसोबत आयकर विभागाच्या मदतीने उत्पन्न जास्त असलेल्या महिलांच्या अर्जांची तपासणी केली जाणार आहे. तसेच ज्या महिलांनी दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यांनाही योजनेतून वगळण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार! सारिपाट / शिवाजी शिर्के प्रभाग...

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...