spot_img
ब्रेकिंगभाजपची पहिली यादी जाहीर; ‘यांना’ मिळाली उमेदवारी, वाचा सविस्तर  

भाजपची पहिली यादी जाहीर; ‘यांना’ मिळाली उमेदवारी, वाचा सविस्तर  

spot_img
Politics News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची (BJP) पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात ९९ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत भाजपने बऱ्याच विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. यासोबतच सदर यादीत काही खास नावे देखील आहेत.

पहिल्या यादीत भाजपने नागपूर दक्षिणमधून-देवेंद्र फडणवीस, कामठी-चंद्रशेखर बावनकुळे, कोथरूड-चंद्रकात पाटील, बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार, नंदूरबार- विजयकुमार गावित, नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले, नाशिक पश्चिमतून सीमा हिरे, चांदवड-राहुल आहेर, बागलाण-दिलीप बोरसे, जिंतूर-मेघना बोर्डीकर,चिखली-श्वेता महाले, खामगाव-आकाश फुंडकर, जळगाव (जामोद)-संजय कुटे, अकोला पूर्व-रणधीर सावरकर, देवली-राजेश बकाने, नागपूर पश्चिम-मोहन मते, धुळे शहर-अनुप अग्रवाल, भोकरदन-संतोष दानवे, सिंदखेडा-जयकुमार रावल, शिरपूर-काशीराम पावरा, भुसावळ-संजय सावकारे, चाळीसगाव-मंगेश चव्हाण, शिर्डी-राधाकृष्ण विखे पाटील, कर्जत जामखेड-राम शिंदे, राहुरी-शिवाजीराव कर्डिले, शेवगाव-मोनिका राजळे, श्रीगोंदा-प्रतिभा पाचपुते यांचा समवेश आहे.

तर भोकरदन-श्रीजया चव्हाण, घाटकोपर पश्चिम-राम कदम, जामनेर-गिरीश महाजन, कणकवली-नितेश राणे, सोलापूर दक्षिण-सुभाष देशमुख, कुलाबा-राहुल नार्वेकर, परतूर-बबनराव लोणीकर, गंगापूर-प्रशांत बंब, छ.संभाजीनगर पूर्व-अतुल सावे, कोल्हापूर दक्षिण-अमल महाडिक, मलबार हिल- मंगलप्रभात लोढा, जळगाव शहर-सुरेश भोळे, रावेर- अमोल जावळे, दौंड-राहुल कुल, मुरबाड-किसन कथोरे, राळेगाव-अशोक उईके, ठाणे-संजय केळकर, डोंबिवली-रवींद्र चव्हाण, कांदिवली पूर्व-अतुल भातखळकर, हिंगोली-तानाजी मुटकुळे, बदनापूर-नारायण कुचे, मिरज-सुरेश खाडे, तुळजापूर-राणा जगजितसिंह पाटील, गोरेगाव-विद्या ठाकूर, नालासोपारा-राजन नाईक, कल्याण पूर्व-सुलभा गायकवाड, फुलब्री-अनुराधा चव्हाण, ऐरोली-गणेश नाईक, विलेपार्ले-पराग आळवणी, निलंगा-संभाजी पाटील निलंगेकर, अचलपूर-प्रवीण तायडे, हिंगणा समीर मेघे, वांद्रे पश्चिम-आशिष शेलार, सातारा-शिवेंद्रराजे भोसले, नागपूर पूर्व-कृष्ण खोपडे यांना उमेदवारी मिळाली आहे.

तसेच चिमूर-बंटी भांगडिया, आर्मोली-कृष्णा गजबे, गोंदिया-विनोद अग्रवाल, तिरोरा-विजय रहांगडाले, आर्मोली – कृष्णा गजबे, वाणी-संजीवरेड्डी बोडकुरवार, किनवट-भीमराव केरम, नायगाव -राजेश पवार, मुखेड-तुषार राठोड, यवतमाळ-मदन येरवर, वडाळा-कालिदास कोलंबकर, मालाड पश्चिम-विनोद शेलार, अक्कलकोट-सचिन कल्याणशेट्टी, भिवंडी पश्चिम-महेश चौगुले, हिंगणघाट-समीर कुणावार, वर्धा-पंकज भोयर, पार्वती-माधुरी मिसाळ, शिवाजीनगर-सिद्धार्थ शिरोळे, भोसरी-महेश लांडगे, चिंचवड-शंकर जगताप, पनवेल-प्रशांत ठाकूर, सायन कोळीवाडा-कॅप्टन आर तमिळ सेल्वम, अंधेरी पश्चिम-अमित साटम, चारकोप-योगेश सागर, दहिसर-मनीषा चौधरी, बेलापूर-मंदा म्हात्रे, केज-नमिता मुंदडा, ओसा-अभिमन्यू पवार, मान-जयकुमार गोरे, कराड-अतुल भोसले, इचलकरंजी-राहुल आवाडे, सांगली-सुधीर गाडगीळ यांचा समावेश आहे.

कार्यकर्त्‍यांनी फटाक्‍यांची आतशबाजी करीत आनंद केला व्‍यक्‍त
भारतीय जनता पक्षाच्‍या केंद्रीय निवडणूक समितीने राज्‍यातील ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्‍ये महसूल तथा अहिल्‍यानगरचे पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍याही नावाचा समावेश असल्‍याने महायुतीच्‍या समर्थक कार्यकर्त्‍यांनी फटाके वाजवून आपला आनंद व्‍यक्‍त केला. या संदर्भात आपली प्रतिक्रीया व्‍यक्‍त करताना मंत्री ना.विखे पाटील म्‍हणाले की, विश्‍वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जे.पी नड्डा, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्‍यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी विश्‍वास दाखवून पुन्‍हा संधी दिल्‍याबद्दल मी त्‍यांचा आभारी आहे. मागील पाच वर्षात सबका साथ सबका विकास या मंत्राने जनतेसाठी तसेच शिर्डी विधानसभा मतदार संघाच्‍या विकासासाठी आपण कार्यरत राहीलो. मतदार संघातील जनतेने तसेच महायुतीच्‍या कार्यकर्ते, पदाधिका-यांनी विश्‍वासाने विकास प्रक्रीयेला साथ देवून दिलेल्‍या  पाठबळामुळे काम करण्‍याचा आत्‍मविश्‍वास अधिकच वाढला. या विधानसभा निवडणूकीत पक्षाने पुन्‍हा दिलेली संधी ही अधिकचे काम करण्‍यासाठी प्रोत्‍साहन असल्‍याची प्रतिक्रीया मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

उमेदवार ठरविण्यात खा. नीलेश लंकेच किंगमेकर!

सारिपाट / शिवाजी शिर्के:- लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार नीलेश...

कृषिनाथ कारखान्याने ऊस उत्पादकांना न्याय दिला; पद्मश्री पवार

खा. नीलेश लंके, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाणपूजन...

मोठी बातमी! राजकीय घडामोडींना वेग; एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे यांच्या सोबत गुप्त बैठक

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागली असून राजकारणात घडामोडींना वेग आला...

ब्रेकिंग! नगरच्या राजकारणात ट्विस्ट!; सत्यजित तांबे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकिय चर्चांना उधाण…

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागली आहे. भाजपने ९९ उमेदवारांची घोषणा...