spot_img
अहमदनगरईश्वरी तुपे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

ईश्वरी तुपे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

spot_img

 

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –

अहिल्यानगर जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी मुली, या शाळेची इ. चौथीची विद्यार्थिनी कु. ईश्वरी मच्छिंद्र तुपे हिने बालगटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.

“मी नदी बोलते” या विषयावर आपल्या ओघवत्या शैलीत केलेल्या सादरीकरणाने तिने परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली. यासाठी तिला तिच्या वर्गशिक्षिका श्रीमती सविता शिंदे ठाणगे आणि तिची आई सौ. रंजना मच्छिंद्र तुपे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

या घवघवीत यशाबद्दल तिचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील, राहाता तालुका गटशिक्षणाधिकारी श्री राजेश पावसे, विस्तार अधिकारी श्री विष्णू कांबळे, केंद्रप्रमुख श्री सोमनाथ जावळे,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शकुंतला गायकवाड नेहे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दीपक विखे व सर्व सदस्य, शाळेतील शिक्षक वृंद, पालक यांनी विशेष कौतुक आणि हार्दिक अभिनंदन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

एक पिंजर्‍यात अडकला | दुसर्‍याला विहिरीतून बाहेर काढला | ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम अहिल्यानगर...