spot_img
ब्रेकिंग'जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी प्रथम पुरस्कार'

‘जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी प्रथम पुरस्कार’

spot_img

राहाता । नगर सहयाद्री:-
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४ मध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविले आहे. हे अभिमानास्पद असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला पाठबळ देणारा आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

वाकडी येथे माध्यमांशी बोलताना ना. विखे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २०२४ साली जलसंपदा विभागाची जबाबदारी होती. त्यांच्या कार्यकाळात विभागाने राज्याच्या जलव्यवस्थापन आणि सिंचन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याला हा सन्मान प्राप्त झाला आहे.

जलसंपदा विभागाच्या यशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून होत असलेले नियोजन तसेच अतिशय पारदर्शकता, तांत्रिक सुधारणा आणि निर्धारीत वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर विशेष भर दिला आहे. धरण सुरक्षा, जलसंवर्धन, सिंचन प्रकल्पांना गती आणि जलस्त्रोतांचा योग्य वापर या सर्व कामासाठी घेतलेल्या निर्णयांचे प्रतिबिंब या पुरस्कारामागे असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

महायुती सरकारच्या माध्यमातून सिंचन सुधारणा कार्यक्रमात सर्व प्रकल्पांची कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करण्यासाठी विभाग प्रयत्न करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने विभागाचा गौरव म्हणजे दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला मिळालेले पाठबळ असून विभागातील सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी यांचेही मोठे योगदान पुरस्कार मिळवण्यात असल्याचा उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी आवर्जून केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राष्ट्रवादीचे धक्का तंत्र; निवडणुकीचा सूर बदलला!, बारामती पॅटर्नची झलक दिसणार?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीला आता रंग चढला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत...

लाडक्या बहिणींना दिलासा! पती व वडील हयात नसलेल्या महिलांनाही KYC करता येणार, वाचा प्रोसेस..

मुंबई | नगर सहयाद्री:- लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रियेबाबत राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा दिलासा...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना शुभ ‘गुरुवार’

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा...

मोबाईल आणि टीव्हीमुळे मुलांचे डोळे धोक्यात! नेत्रतज्ज्ञांच्या 6 सोप्या टिप्स वाचा एका क्लिकवर

नगर सहयाद्री वेब टीम आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टीव्ही आणि ऑनलाइन क्लासेसमुळे लहान मुलांमध्ये...