spot_img
ब्रेकिंगदिवाळीपूर्वीच फुटणार आमदारकीचे फटाके? विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार..

दिवाळीपूर्वीच फुटणार आमदारकीचे फटाके? विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार..

spot_img

मुंबई | नगर सहयाद्री
लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वांना आता निकालाची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे, तर हरियाणामध्ये ३ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात एकाचवेळी निवडणुका होण्याची शक्यता असून, साधारणपणे ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडतील, अशी चिन्हे आहेत.

सध्याच्या विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा दुसर्‍या दिवशी नवीन विधानसभा स्थापन करणे आवश्यक आहे. परिणामी, हरियाणा विधानसभेची स्थापना ४ नोव्हेंबरपर्यंत झाली पाहिजे. २००९ पासून, महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी होत आहेत. दोन्ही विधानसभांचा कार्यकाळ २३ दिवसांनी संपत असल्याने नियमानुसार दोन्ही राज्यांच्या एकत्र निवडणुका घेणे आवश्यक आहे. दरम्यान, यंदा २९ ऑक्टोबर ते ०३नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी साजरी होणार आहे.

सहसा सणांच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेण्यासाठी पुरेसा वेळ असला तरी हरियाणातील वेळापत्रकानुसार महाराष्ट्रात आधी निवडणुका होण्याची शक्यता आहे. सन २०१९ मध्ये दोन्ही राज्यांमध्ये २१ ऑक्टोबर रोजी निवडणुका झाल्या होत्या. त्यानुसार, यावर्षी २१ ते २६ ऑक्टोबर दरम्यान त्याच तारखेच्या आसपास मतदान होण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वीच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यास उमेदवार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना फटाके फोडण्याची मोठी संधी मिळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...