नेवासकरांतून बेजबाबदार अधिकाऱ्यांचा निषेध
नेवासा । नगर सहयाद्री:-
नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात शुक्रवार (दि. २७) रोजी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १२ व्यावसायिक दुकानाची राख झाल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही, परंतु शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नेवासा नगरपंचायत समोरच झालेल्या या जळीत कांडाच्या परिस्थितीचे अवलोकन करुन परिस्थितीच्या उपाययोजनेसाठी नगरपंचायतीचा एकही अधिकारी आणि नगरपंचायतीवर प्रशासक असलेल्या नेवासा तहसिल कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी जळीत झालेल्या ठिकाणी शनिवारी सुट्टी असल्याचा बहाणापुढे करत उपलब्ध झालेला नसल्यामुळे नेवासकरांतून प्रशासनाच्या लहरी कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच नेवासा नगरपंचायतीच्या आपत्कालीन स्थितीच्या उपाययोजनेसाठी असलेले दोन कर्मचारी नगरपंचायत चौकात ठाण मांडून बसून आहेत त्यामुळे नेवासकरांतून अधिकाऱ्यांच्या असंवेदनशील व बेजबाबदार वर्तणुकीचा नेवासा शहरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
नेवासा शहरातील बारा व्यावसायिक दुकांनाना अचानक लागलेल्या या आगीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असून या लागलेल्या आगीत व्यावसायिकांचे मोठे प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी असा अंदाज नागरीकांतून व्यक्त करण्यात येत अाहे या लागलेल्या आगीत व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे व्यावसायिकांवर प्रचंड संकट कोसळलेले आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नगरपंचायत चौकात रात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सुमारे बारा दुकाने जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे शनिवारी सकाळपर्यंत ही आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू होते या लागलेल्या आगीने मोठे रौद्ररुपधारण केल्यामुळे या आगीत फुटवेअर,बेकरी,जनरल स्टोअर,फुल भांडार अशी विविध दुकाने जळून खाक झालेली आहेत. ही आग एका दुकानात शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागल्याची प्राथमिक चर्चा नेवासा शहरात होतांना दिसत आहे त्यामुळे एका दुकाणाला लागलेल्या आगीमुळे एका मागून एक अशा बारा दुकाणांना या आगीने भस्यस्थानी घेरल्यामुळे बारा दुकाणे जळून बेचिराख झालेली आहेत.
या घटनेमुळे शहारत सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून घडलेल्या जळीताचा पंचनामा करुन नेवासा पोलीस ठाण्यात जळीत प्रकरणात नुकसान झालेल्या व्यावसायिकांनी आपली फिर्याद दाखल केलेल्या आहेत. संकटाच्या काळात अग्नितांडव थांबविण्यासाठी लोकनेते स्व.मारुतरावजी घुले पाटील श्री.ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आग विझविण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल नेवासकरांतून ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले.