अग्निशमन विभागाने आग आणली आटोक्यात
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
|नगर शहरातील गंगा उद्यान परिसरातील भंगारच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमरास घडली. या आगीच्या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मनपाच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली असल्याची माहिती अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ यांनी दिली.
सोमवारी सकाळी गंगा उद्यान समोरील भंगाराच्या दुकानाला आग लागली. आगीची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी पोहोचली. अन आग आटोक्यात आणली. कचरा जाळल्यामुळे ही आग लागल्याची माहिती सांगण्यात येत आहे. आगीमध्ये भंगाराच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
प्रथमदर्शनी या ठिकाणी कोणतीही जीवित हानी झाली नाही. भंगार साहित्य जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे वाहनलचालक वाडेकर, फायरमन प्रभात साठे, सूरज पोकळे, ऋषिकेश आव्हाड, मयूर लाळगे, सिदार्थ खरात, नागनाथ नाईक, शुभम साठे यांनी शतचे प्रयत्न केले.