spot_img
अहमदनगरकामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोराटे यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत तक्रारदाराला दमदाटी केल्याचा आरोप आहे. ही घटना 17 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4:36 ते 4:40 च्या सुमारास जुन्या कोर्ट परिसरात घडली. तर सहायक अभियंत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नगरसेवक मनोज कोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. सतीश राजुरकर हे मनपाच्या वैद्यकीय विभागात कर्तव्य बजावत असताना बोराटे एका व्यक्तीला घेऊन आले. एका व्यक्तीच्या मृत्यूबाबत माहिती विचारताना बोराटे यांनी डॉ. राजुरकर यांना तुम्ही काम करत नाही, तुम्ही नोकर आहात हे विसरू नका, असे म्हणत दमदाटी केली. यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक शेष मॅडम पुढील तपास करीत आहेत.

केडगाव सब स्टेशन येथे कार्यरत असलेले सहायक अभियंता राहुल सिताराम शिलावंत यांनी नगरसेवक मनोज कोतकर यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. कोतकर यांनी शिलावंत यांना फोनवरून शिवीगाळ करून दमदाटी केली, तसेच कार्यालयाबाहेर भरधाव इनोव्हा गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. ही घटना 16 जुलै 2025 रोजी केडगाव सब स्टेशन, हॉटेल निशा पॅलेस शेजारी, अहिल्यानगर येथे घडली.राहुल शिलावंत (वय 35, रा. मोरया अपार्टमेंट, शाहूनगर, केडगाव) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ते महावितरणच्या केडगाव शाखेत सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. 16 जुलै रोजी सायंकाळी कोतकर यांचा फोन आला. लोंढेमळा, खंडोबा मंदिर परिसरात डिस्ट्रिब्युशन बॉक्स बसवण्याच्या कामाबाबत कोतकर यांनी शिलावंत यांना विचारणा केली.

यावर शिलावंत यांनी एक बॉक्स बसवला असून दुसरा बसवण्यापूव बोलवणार असल्याचे सांगितले. यावरून कोतकर यांनी रागावत शिलावंत यांच्या कुटुंबावरून शिवीगाळ सुरू केली. शिलावंत यांनी विरोध केला असता, कोतकर यांनी मी ऑफिसवर येतो, तिथेच थांबा असे म्हणत फोन कट केला.काही वेळाने कोतकर पांढऱ्या इनोव्हा गाडीतून सब स्टेशनवर आले. शिलावंत बाहेर आल्यानंतर कोतकर यांनी गाडी भरधाव चालवत त्यांच्या अंगावर घातली. जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. कर्मचारी वैभव निकम आणि पोपट सातपुते यांनी शिलावंत यांना वाचवले. यानंतर कोतकर यांनी शिलावंत यांना जातीवाचक शिवीगाळ, धक्काबुक्की आणि धमकी दिली. या घटनेमुळे घाबरलेल्या शिलावंत यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनिल राहिंज आणि कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांना माहिती दिली. चव्हाण यांच्या सल्ल्‌‍याने शिलावंत यांनी 17 जुलै रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती तपास करीत आहेत.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...

बदनाम करण्यासाठी ‘त्यांची’ दुकानदारी, भ्रष्टाचार काळात शिवसेनेची सत्ता; आ. जगताप यांनी विरोधकांचा घेतला समाचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे स्वयंघोषित नेते खा. संजय राऊत यांना...

विधिमंडळ वादाचा आखाडा?; मध्यरात्री मोठा राडा!, काय काय घडलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- गुरुवारी 17 जुलै विधिमंडळाच्या लॉबीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार...