पारनेर | नगर सह्याद्री
आझाद ठुबे यांच्या अधिपत्याखालील राजे शिवाजी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी गोरेश्वर पतसंस्थेचे माजी अध्यक्ष बाजीराव पानमंद यांना पहाटेच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोरेगाव येथील त्यांच्या निवास्थानातून अटक केली.
गोरेश्वर पतसंस्थेतील ठेवीची मोठी रक्कम बाजीराव पानमंद यांनी कोणत्याही परवानगी शिवाय राजे शिवाजी पतसंस्थेकडे वर्ग केली होती. या प्रकरणात चौकशी अहवाल समोर आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने राजे शिवाजी प्रकरणी गुन्हा दाखल केला.
चौकशीमध्ये गोरेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव पानमंद यांचा थेट सहभाग असल्याचे समोर येताच गुन्हे शाखेच्या पथकाने बाजीराव पानमंद यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली.