spot_img
अहमदनगरअखेर पारनेर तहसिलदारांच्या विरोधात याचिका दाखल! नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

अखेर पारनेर तहसिलदारांच्या विरोधात याचिका दाखल! नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर

spot_img

सुपा । नगर सहयाद्री:-
शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर पारनेर तहसिलदारांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने ५ ऑगस्टला तहसिलदारांना नोटीस दिली आहे. या प्रकरणांची पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना प्रशासकीय अधिकार्‍यांना ६० दिवसांच्या आत शिव शेतपानंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. परंतु १७ जुलै २०२३च्या हायकोर्टाच्या निकालाला १ वर्ष पूर्ण होऊनही सदर आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही.

त्यामुळे शेतकर्‍यांनी पुन्हा न्यायालयाचा अवमान केल्याच्या कारणावरून तहसिलदारांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. अ‍ॅड. प्रतिक्षा काळे यांच्या मार्फतही याचिका दाखल करण्यात आली आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि हायकोर्टाच्या आदेशांचा आदर राखण्यासाठी अखेर तहसिलदारांविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. पारनेर, श्रीगोंदा, संगमनेर, राहुरी, नेवासा, कर्जत, श्रीरामपुर तालुक्यातील शेत रस्तेपीडित शेतकरी यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या शेतकर्‍यांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

जनजागृतीच्या माध्यमातून संघर्ष
भविष्यात शेवटच्या शेतकर्‍याला दर्जेदार शेतरस्ता जोपर्यंत मिळत नाही. तो पर्यंत प्रशासकीय, न्यायालयीन, जनआंदोलन, जनजागृतीच्या माध्यमातून संघर्ष सुरूच ठेवणार
-शरद पवळे (शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी आजचा दिवस ‘लकी’..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य...

पैसा झाला खोटा, घोटाळा झाला मोठा जादा परताव्याचे आमिष ; अहिल्यानगरकरांचे करोडो रुपये लुटले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा...

‌‘एपीएमसी‌’ मार्केट नवी मुंबईतून हद्दपार?, वाचा कारण..

नवी मुंबई | नगर सह्याद्री मुंबईतील वाढती लोकवस्ती, वाहतुकीचे प्रश्न आणि जागेची अनुपलब्धता या कारणांसाठी...

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला....