spot_img
ब्रेकिंगअखेर विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा संपली! दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद, आज घोषणा...

अखेर विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा संपली! दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद, आज घोषणा होणार..

spot_img

Election Commission Of India Press Conference: भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली आहे. भारत निवडणूक आयोगाकडून आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे, त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा शक्यता आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात आचारसंहिता लागणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला होता. तेव्हाच विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होणार, याचे संकेत मिळाले होते. सोमवारी दुपारीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत टोलमाफीसह अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले होते. याशिवाय, आज दुपारी 12 वाजता राज्यपालनियुक्त 7 आमदारांचा विधानभवनात शपथविधी पार पडेल. यानंतर लगेच दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर विधानसभेची पहिली निवडणूक होत आहे. यामुळं राज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची असेल. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या ठरणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर! महत्वाचे कारण आले समोर, वाचा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था -  मागील चार ते पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

आधी पाप केलं, आता सल्ले देऊ नका!, निवृत्ती घ्या!; शरद पवार यांच्या टीकेला मंत्री विखे पाटलांचे प्रतिउत्तर

नाशिक । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने नाशिक येथे भव्य शेतकरी...

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन...

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना खुशखबर! सरकारचा मोठा निर्णय?, समोर आली अपडेट

मुंबई ।नगर सहयाद्री:- भारत हा कृषीप्रधान देश असून कोट्यवधी शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत....