spot_img
अहमदनगर...अखेर दुचाकी चोर गवसला! कोतवाली पोलीसांची कारवाई

…अखेर दुचाकी चोर गवसला! कोतवाली पोलीसांची कारवाई

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलीसांकडून जेरबंद केले. आरोपी मोहमद मुसा शेख (रा. कोठला झोपडपट्टी, अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी आरोपीकडून चोरीची मोटारसायकल हस्तगत केली आहे.

गौतम रघुनाथ आरगडे (वय-१९ वर्षे, रा. सौदाळा, ता. नेवासा, जि. अहमदनगर) यांची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटार सायकल ९ नोव्हेंबर २०२४ रोजी मध्य रात्री पार्किंगमधून चोरीला गेली होती. फिर्यादी गौतम आरगडे यांनी याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास सुरु असतांना गुन्हे शोध पथकाला सदरची दुचाकी कोठला झोपडपटटी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकांने दुचाकीसह आरोपी मोहमद मुसा शेख याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने सुरुवातीला गोंधळाचे उत्तर दिले, परंतु अधिक तपासणी केल्यानंतर त्याने मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, साो सपोनि योगीता कोकाटे, पोहेकाँ योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलिम शेख, विक्रम वाघमारे, शरद वाघ, मपोना वंदना काळे, पोकाँ अभय कदम, अमोल गाढे, सतिष शिंदे, अतुल काजळे, यांच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट ; नगरसेवक योगीराज गाडे काय म्हणाले पहा

अहिल्यानगर । नगर सह्याद्री महापालिका व आयुक्त यशवंत डांगे जनतेची दिशाभूल करत असून नव्या कचरा...

आयुक्त डांगेंच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, नेमकं प्रकरण काय पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर...

धक्कादायक ! डॉक्टर महिलेच्या मृत्यूचा PM रिपोर्ट आला पण…’या’ प्रश्नांचं गूढ अद्याप कायम

सातारा / नगर सह्याद्री - सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या युवा...

बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम; पारनेरचे भूमिपुत्र आंदोलनात दाखल

पारनेर / नगर सह्याद्री - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी...