spot_img
ब्रेकिंग...अखेर नारायणगव्हाण ग्रामस्थांच्या लढ्याला यश! चौपदरीकरणासाठी 'असा' निघाला तोडगा

…अखेर नारायणगव्हाण ग्रामस्थांच्या लढ्याला यश! चौपदरीकरणासाठी ‘असा’ निघाला तोडगा

spot_img

सुपा / नगर सह्याद्री
नगर – पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण गावच्या चौपदरीकरणाच्या संबंधित प्रलंबित कामांसाठी सचिन शेळके यांच्यासह ग्रामस्थांने केलेल्या उपोषणाच्या लढ्याला यश आले आहे. आ. निलेश लंके यांच्या मध्यस्तीनंतर यावर तोडगा निघाल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.

महामार्गावर अपघातांची मोठी मालिका सुरू असल्यामुळे दिवसेंदिवस गाड्यांची वाढती संख्या व अरुंद रस्ता यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना जीव मुठीत धरून महामार्गावर प्रवास करावा लागतो. गावच्या सुरक्षिततेसाठी सचिन शेळके यांसह ग्रामस्थांनी सोमवारी (दि. ११ मार्च) उपोषण सुरू केले होते. आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळत असताना ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनस्थळी पंचक्रोशितील ग्रामस्थ, भाजपा तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, मनसे नेते अविनाश पवार, यांसह विविध पदाधिकार्‍यांनी भेटी देवून आंदोलनकर्त्यांचे मनोबल वाढवले.

मदतीची भुमिकाही ठेवली परंतु सचिन शेळके यांनी रस्त्याच्या मोजणीची तारीख मिळावी यासाठी आग्रह धरला होता. उपोषणाच्या पाचव्या दिवशी आमदार लंके यांनी उपोषणस्थळी भेट देत तातडीने संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. तातडीने प्रस्तावाच्या दुरुस्त्या केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रांताधिकारी यांची नियुक्ती केली. त्यानंतर सचिन शेळके सह ग्रामस्थांचे उपोषण आमदार निलेश लंके व सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन सोडण्यात आले.

यावेळी गावचे उपसरपंच राजेश शेळके यांनी आमदार निलेश लंके यांचे आभार मानले. उपोषणकर्ते सचिन शेळके यांनी आंदोलनाला पाठबळ देणार्‍या सर्वांचे आभार मानत आंदोलन मागे घेतले. यावेळी सरपंच मनीषा जाधव, चेअरमन बाळासाहेब चव्हाण, दादासाहेब शेळके, तानाजी पवळे, रामदास जाधव,गणेश शेळके, अर्जून वाल्हेकर, लक्ष्मण शेळके, संपत जाधव, धोंडीबा गायकवाड, हौसिराम कुदळे आदींसह महिला, विद्यार्थी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षणाचा GR फाडला, OBC नेते आक्रमक, आता राज्यव्यापी आंदोलन

पुणे / नगर सह्याद्री - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर...

संयमाने परिस्थिती हाताळत, अभूतपूर्व पेचातून मार्ग काढत कसोटीस उतरलेले संयमी नेतृत्व विखे पाटील खरेखुरे वास्तववादी संकटमोचक!

सारिपाट / शिवाजी शिर्के काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील उपोषणात गिरीष...

मावा अड्ड्यावर छापा; एलसीबीची मोठी कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत मावा अड्डयावर छापा...

जादा परताव्याचे आमिष; १.६० कोटींची फसवणूक, १५ आरोपी, पोलिसांनी केले असे…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरमध्ये इनफिनाईट बिकन इंडिया प्रा. लि. आणि ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रा. लि....