मुंबई । नगर सहयाद्री
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)नामांतराच्या वादावर आज हायकोर्टाने फैसला दिला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांनी आव्हान दिलं होतं. मात्र, हायकोर्टात यासंबंधित सर्व याचिका फेटाळल्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
४ ऑक्टोबर २०२३ रोजी यावर सुनावणी पूर्ण करत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने आपला अंतिम निकाल राखून ठेवला होता. तो निकाल आज जाहीर केला आहे.
तो निकाल जाहीर करताना राज्य सरकारने महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या भागात उस्मानाबाद आणि औरंगाबाद यांचे अनुक्रमे धारशिव आणि छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय अतिशय योग्य आहे. या निर्णयामुळे कोणालाही फरक पडणार नाही, असा निकाल देत स्थानिकांनी केलेल्या याचिका फेटाळल्या आहे.
.