जामखेड । नगर सहयाद्री:-
१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी ऋषिकेश पिमराव वाळुंजकर ( रा. जवळके ता. जामखेड ) याला न्यायलयाने जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
जामखेड तालुक्यातील जवळके गावात दि. ११ मार्च रोजी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आरोपी ऋषिकेश पिमराव वाळुंजकर याच्या विरुद्ध खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. विशेष तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी या प्रकरणाचा निकाल देत आरोपी वाळुंजकर यास जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणाचा तपास खर्डा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी केला. सरकारी वकील म्हणून श्रीमती कापसे यांनी काम पहिले.