spot_img
अहमदनगरअखेर भोवलं! अहिल्यानगर मधील 'या' हॉटेलचा परवाना रद्द

अखेर भोवलं! अहिल्यानगर मधील ‘या’ हॉटेलचा परवाना रद्द

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यात 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी ड्राय डे असतानाही नवीन टिळक रस्त्यावरील हॉटेल निमंत्रण येथे मद्यविक्री सुरू असल्याने, तसेच मद्यविक्रीच्या नोंदवह्या अपूर्ण असल्याने निमंत्रण हॉटेलचा परमिट रूमचा परवाना रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी हे आदेश काढले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला 6 डिसेंबर रोजी ड्राय डे असतानाही निमंत्रण हॉटेल येथे मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर विभागाचे दुय्यम निरिक्षक व कोतवाली पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी काही व्यक्ती मद्यप्राशन करत असल्याचे व हॉटेलमधील स्टाफ त्यांना मद्य पुरवत असल्याचे समोर आले.

पथकाने घटनास्थळी पंचनामा करून तेथील नोंदवहीची तपासणी केली. त्यातही नोंदी अपूर्ण होत्या. पथकाने त्यांना जागेवरच आरोपपत्र असलेली नोटीस बजावून खुलासा मागवला. हॉटेलमध्ये जेवण करणारे व्यक्ती त्यांनी लपवून आणलेले मद्य घेत होते. हॉटेलमधील मद्यविक्री त्यादिवशी बंद होती, असा खुलासा हॉटेलचे मालक नंदकिशोर राऊत यांनी केलं.

त्यावर जिल्हाधिकारी सालीमठ यांनी हा खुलासा अमान्य करत मड्राय डेफच्या दिवशी मद्यविक्री सुरू होती, हे गंभीर असल्याचे स्पष्ट करत मुंबई विदेशी मद्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निमंत्रण हॉटेलचा परमिट रूमचा परवाना रद्द केला आहे.

मद्यविक्री सुरू होती, हे गंभीर असल्याचे स्पष्ट करत मुंबई विदेशी मद्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निमंत्रण हॉटेलचा परमिट रूमचा परवाना रद्द केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...