spot_img
अहमदनगरसिनेसृष्टीवर शोककळा; अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन

सिनेसृष्टीवर शोककळा; अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री
‘काँटा लगा गर्ल’ म्हणून ओळख निर्माण केलेली आणि ‘बिग बॉस १३’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं ४२ व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे तिचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली असून, तिच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

२७ जूनच्या रात्री शेफालीच्या छातीत अचानक दुखू लागल्यामुळे तिला अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यासोबत तिचा पती पराग त्यागी आणि कुटुंबातील काही सदस्य होते. मात्र, रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शेफालीच्या निधनामुळे अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर तीव्र शोक व्यक्त केला आहे.

अभिनेता अली गोनी, राजीव अदातिया आणि इतर कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेफालीला श्रद्धांजली वाहिली आहे. “ही बातमी धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.शेफाली जरीवालाने २००२ मध्ये आलेल्या ‘काँटा लगा’ या रिमिक्स गाण्याच्या माध्यमातून लोकांच्या मनात घर केलं.

हे गाणं प्रचंड गाजल्यानंतर तिला ‘काँटा लगा गर्ल’ अशी ओळख मिळाली. त्यानंतर तिनं ‘मुझसे शादी करोगी’, ‘नच बलिए ५’, आणि ‘बिग बॉस १३’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. तिची स्टाईल, आत्मविश्वास आणि स्क्रीन प्रेझेन्स यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली.शेफालीच्या आकस्मिक निधनानंतर तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत, तिच्या जुन्या गाण्यांचे आणि कार्यक्रमांचे व्हिडिओ शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

तयारीला लागा! भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी पदाधिकार्‍यांना आवाहन; महापालिकेवर…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकार्‍यांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त करत शहर...

पोस्ट ऑफिसमध्ये धक्कादायक प्रकार!, कर्मचार्‍यासोबत घडलं असं काही..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये कर्मचारी संदीप निवृत्ती मिसाळ (वय ३५,...

गाव हादरलं! कुटुंबावर हल्ला, घरावर दगडफेक, दागिणे लुटले, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री व्यवसायाची टीप पोलिसांना दिल्याच्या संशयावरुन अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर (बायजाबाई) येथे...

भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष! चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी कुणाची होणार नियुक्ती?

मुंबई । नगर सह्याद्री:- राज्य भाजप कार्यकारिणीमधील उत्सुकता अखेर संपली असून भाजपला मिळणार नवा...