अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात झालेल्या ४ भिक्षेकर्यांच्या मृत्यूस जबाबदार असणार्या जिल्हा शल्यचिकित्सक व इतर संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे शहराध्यक्ष वैभव कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
शिर्डी, अहिल्यानगर येथे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अनेक भिक्षेकर्यांना प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांची रवानगी विसापूर (ता.श्रीगोंदा) येथे भिक्षेकरी गृहात केली होती. दरम्यान काही भिक्षुकांना त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे उपचारासाठी आणण्यात आले होते. दरम्यानच्या काळात सदर भिक्षुकांना जिल्हा रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्याने त्यातील ४ भिक्षेकर्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जर योग्य वेळेत योग्य उपचार या भिक्षुकांवर झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. जिल्हा रुग्णालयातील डॉटर व कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे व बेजबाबदार वागण्यामुळे हे ४ मृत्यू झालेले आहेत.
त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचे एक जबाबदार अधिकारी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक व रुग्णालयातील इतर संबंधित डॉटर व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी वैभव कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.